डिजी होम लोनचा ३०० कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:16+5:302021-08-02T04:08:16+5:30
पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु होम लोनचा विषय रखडला ...
पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु होम लोनचा विषय रखडला होता. पांडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार ३०० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याचा आता पाठपुरावा सुरू आहे. पोलीस निरीक्षक ते उपाधीक्षक पदोन्नतीची बैठक ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. जवळपास २०० पोलीस निरीक्षकांना त्यात पदोन्नती मिळू शकते. पदोन्नतीनंतर त्यांची समवर्ग बदली होणार आहे. पीसी ते पीएसआयची कारवाई शेवटच्या टप्प्यात आली आहे. २०१३ बॅचच्या काही लोकांना प्रमोशन न देता २०१४ च्या बॅचला ते देण्यात आले होते. त्याबाबत सुधारीत आदेश बुधवारपर्यंत काढण्यात येणार आहेत. २०१७ बॅचच्या काही अधिकाऱ्यांना पीआयचे प्रमोशन न देता २०१६च्या बॅचला ते दिले होते. त्याबाबतही आदेश काढले जातील. महात्मा फुले जीवनदायी योजनेबाबतही पाठपुरावा करण्यात येत आहे.
चौकट- तांत्रिक पदाच्या विनंतीवरूनच बदल्या
वायरलेस, डॉग स्क्वॉड, मोटर परिवहन या सर्व बदल्या फक्त विनंतीवरूनच होणार आहेत. त्यांची सर्वसामान्य बदली केली जाणार नाही. कार्यकाळ संपला म्हणून बदली होणार नाही, असेही डीजी पांडे यांनी स्पष्ट केले.
चांगल्या कामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाका
पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले असल्यास त्याचे व्हिडीओ, फाेटो हे फेसबुकवर शेअर करावेत. जेणेकरून अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे महासंचालक कार्यालयाकडून कौतुक करता येईल. फक्त तो ड्युटीशी संबधित असला पाहिजे. जसे ट्रॉफिकमध्ये अडकलेल्यांना मदत करणे, चांगला गुन्हा उघडकीस आणणे आदी. असेही आदेश पांडे यांनी दिले आहेत.