मूकबधिरतेच्या अपंगत्‍वाने सामाजिक विकासाला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:07+5:302021-03-04T04:32:07+5:30

सुनो फाऊंडेशनच्‍यावतीने नवजात शिशुतील बहिरेपणा ओळखणे, तपासणी व निदान करण्‍याची मोहीम हाती घेण्‍यात आली आहे. आता सुनो फाऊंडेशन व ...

Disability of deafness hinders social development | मूकबधिरतेच्या अपंगत्‍वाने सामाजिक विकासाला बाधा

मूकबधिरतेच्या अपंगत्‍वाने सामाजिक विकासाला बाधा

Next

सुनो फाऊंडेशनच्‍यावतीने नवजात शिशुतील बहिरेपणा ओळखणे, तपासणी व निदान करण्‍याची मोहीम हाती घेण्‍यात आली आहे. आता सुनो फाऊंडेशन व जिल्‍हा परिषदेच्‍या संयुक्‍त विद्यमाने जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रातून लहान मुलांतील बहिरेपणा ओळखणे, तपासणी व उपचार याविषयी जनजागृती केली जाणार असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

बाळ जन्‍मल्‍यानंतर दीड वर्षापर्यंत बाळाला ऐकता येते का? याची चाचपणी पालक करीत असतात. पण तोपर्यंत उशिर झालेला असतो. मुले जन्‍मत:च श्रवणाची तपासणी होणे आवश्‍यक आहे. लॉयन्‍सच्‍यावतीने गेल्‍या दोन वर्षापासून नवजात शिशुची श्रवण तपासणी केली जात आहे. आतापर्यंत १२१ बालकांमधील बहिरेपणावर उपचार करण्‍यात आले. १० मुलांना श्रवण यंत्रही देण्‍यात आल्याचे डॉ. लक्ष्‍मीकांत बजाज यांनी सांगितले.

Web Title: Disability of deafness hinders social development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.