जिल्ह्यात आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:48+5:302021-03-08T04:17:48+5:30
शासकीय कार्यालयासमोर उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलन, आदी बाबींना प्रतिबंध राहणार आहे. दोन किंवा तीन व्यक्तींनाच निवेदन देता येणार आहे. ...
शासकीय कार्यालयासमोर उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलन, आदी बाबींना प्रतिबंध राहणार आहे. दोन किंवा तीन व्यक्तींनाच निवेदन देता येणार आहे. सार्वजनिक समारंभास ज्येष्ठ नागरिक, तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब व इतर आजार असलेल्या, गरोदर माता, दहा वर्षांखालील मुलांना प्रवेश देऊ नये, समारंभाला येणाऱ्या लोकांची यादी प्रशासनाकडे सादर करावी, त्यामध्ये मोबाईल क्रमांक व पत्ता नमूद करावा, या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ७ मार्च रोजी काढलेल्या आदेशात दिला आहे.
चौकट------------
संयुक्त पथकांची स्थापना
महापालिका हद्दीत महापालिका व पोलीस विभागाने संयुक्त पथके स्थापन करावीत, नगरपालिका व पोलिसांची तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलिसांची संयुक्त पथके कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. वाहनचालकांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. विना मास्क आढळल्यास ५०० रुपये दंड व वाहन जप्त करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणीही मास्क न वापरणाऱ्या पहिल्या कारवाईत ५००, तर दुसऱ्यांदा पुन्हा आढळल्यास ५०० रुपये दंडासह फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. दुकानामध्ये कोरोना नियमावलीचे पालन न केल्यास पहिल्यावेळी पाच हजार, दुसऱ्यांदा पाच दिवसांसाठी दुकान सील व पाच हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा नियमांचा भंग केल्यास दुकान, आस्थापना सील करून परवाना कायमचा रद्द करण्यात येईल.