लिंबोटी धरणाचे 5 दरवाजे उघडून 236.26 क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:46 PM2020-09-18T16:46:31+5:302020-09-18T16:46:53+5:30
गुरुवारी धरणातील पाणी पातळी ही 447.42 मीटर एवढी होती आणि पाणीसाठा 73.62 दलघमी होता.
लोहा : उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणातीलपाणीसाठा गुरुवारी ( दि. 17) 97.25 टक्क्यांवर गेला. तसेच आवक सुरूच असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. यामुळे मध्यरात्री धरणाचे पाच दरवाजे उघडून 236.26 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पहाटे पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जी. कुरेकर यांनी दिली.
गुरुवारी धरणातील पाणी पातळी ही 447.42 मीटर एवढी होती आणि पाणीसाठा 73.62 दलघमी होता. धरणावरील पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा येवा सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. मध्यरात्री 2 वाजता धरणाचे पाच दरवाजे 50 सेमीने उघडून 236.26 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याचा येवा थांबल्याने दि. 18 रोजी पहाटे 4 वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले.
या गावांना सतर्कतेचा इशारा
पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर लोहा तालुक्यातील लिंबोटी, डोंगरगाव, चोंडी, दगडसांगवी तर कंधार तालुक्यातील उमरज, बोरी (खु), संगमवाडी, घोडज, बाळांतवाडी, शेकापूर, हणमंतवाडी, कोल्ह्याचीवाडी, इमामवाडी आदी गावांना धोका निर्माण व्होऊ शकतो. यामुळे प्रशासनाकडून या गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.