पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:01+5:302021-01-04T04:16:01+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि अशोक कोलते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हंसराज वैद्य आणि अशोक तेरकर यांची उपस्थिती ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि अशोक कोलते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हंसराज वैद्य आणि अशोक तेरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते डी.के. पाटील आणि ॲड. बंगाळे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठकीमध्ये नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांना दिली जाणारी कायदेशीर मदत, ज्येष्ठांनी कोरोना काळात घ्यावयाची काळजी, ज्येष्ठांच्या समस्या आणि उपाय इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
डॉ. हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठांनी कोरोना काळात घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले तर अशोक तेरकर यांनी ग्रामीण भागातील ज्येष्ठांसाठी कायदेविषयक चर्चासत्र आणि बैठका आयोजित कराव्यात असे मत प्रतिपादन केले.
सपोनि अशोक कोलते यांनी अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठांसाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत पोलीस विभागाच्या वतीने निश्चितच दिली जाईल असे सांगितले.
बैठकीत गंगाधर नायगावकर, स.ना. आंबेकर, सुभाष बा-हाळे, मिर्झा मुनीर बेग, डॉ. सुनील म्हैसेकर, प्रा. आनंदराव इनामदार, सम्राट हाटकर, रामचंद्र कोटलवार, डॉ. दीपक केसरी, रघुनाथ सरदेशपांडे, चंद्रकांत जटाळ, जयवंत सोमवाड, माधव निवघेकर, के.एम. वाकडे, गोविंदराव चव्हाण, तुकाराम बनाटे, प्रभाकर कुंटूरकर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुभाष बा-हाळे, गंगाधर नायगावकर, सम्राट हाटकर, प्रा. आनंद इनामदार, एम.डी. निवघेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन पोउपनि सविता खर्जुले यांनी केले. यशस्वितेसाठी महिला सहायक कक्षाचे संजय जोशी, डॉ. ज्योती कदम, क्रांती बंदखडके, शुभांगी जाधव यांनी परिश्रम घेतले.