कोव्हिशिल्ड नावाचा विवाद आता व्यावसायिक न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:25+5:302021-01-08T04:53:25+5:30

नांदेड - कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी येथील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (सिरम) बनवत असलेल्या लसीच्या नावावर नांदेड येथील क्‍युटीस ...

A dispute over covishield is now in commercial court | कोव्हिशिल्ड नावाचा विवाद आता व्यावसायिक न्यायालयात

कोव्हिशिल्ड नावाचा विवाद आता व्यावसायिक न्यायालयात

googlenewsNext

नांदेड - कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी येथील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (सिरम) बनवत असलेल्या लसीच्या नावावर नांदेड येथील क्‍युटीस बायोटीक या कंपनीने हरकत घेतली होती व त्या अनुषंगाने दिनांक ११ डिसेंबर २० रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याला सिरम कडून न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आक्षेप घेतला होता व हे प्रकरण फक्त व्यावसायिक न्यायालयात चालू शकते असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे क्‍युटीस बायोटेक हा वाद नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात घेऊन जाईल असा अंदाज बांधून सिरमने नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात कॅवेट टाकून ठेवली होती परंतु क्‍युटीस बायोटेकने थेट पुण्याचे न्यायालय गाठले.

कोव्हिशिल्ड या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही सिरमच्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे सिरमने लसीची निर्मिती करावी, मात्र तिचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे.

कोव्हिशिल्डला परवानगी देण्यासाठी अर्ज केल्यानंतर सिरम कोव्हिशिल्ड या ट्रेडमार्कचा वापर करीत असल्याची माहिती क्‍युटीसला मिळाली आहे. आम्ही २९ एप्रिल २० रोजी कोव्हिशिल्ड हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी रजिस्टर कार्यालयाकडे अर्ज केला होता. सिरमने त्यानंतर म्हणजे तीन जून २० रोजी अर्ज केला आहे. ट्रेडमार्कला अर्ज केल्यानंतर आम्ही कोरोनाशी लढा देण्यासाठी कोविशिल्ड नावाने विविध उत्पादने ३० मे पासून बनवायला व त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. हे सर्व उत्पादन कोव्हिशिल्ड या ट्रेडमार्कखाली उत्पादित व विक्री केली जात आहेत. मात्र आता सिरमने त्यांची लस ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने बाजारात आणण्याची तयारी केल्याने ट्रेडर्स आमची उत्पादने घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसत आहे. या सर्वांचा विचार करून सिरमने त्यांच्या लसीचे नाव बदलावे, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. ॲड. आदित्य सोनी यांच्यामार्फत क्‍युटीसने ही याचिका दाखल केली आहे.

दोघांचेही अर्ज अद्याप प्रलंबित

कोव्हिशिल्ड हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी क्‍युटीस बायोटीक आणि सिरम या दोनही कंपन्यांनी अर्ज केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला हा ट्रेडमार्क देण्यात आलेला नसून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांनी आपली उत्पादने कोव्हिशिल्ड या नावाने उत्पादित करण्यास सुरवात केली आहे.

सिरमने नफा आम्हाला द्यावा

कोव्हिशिल्ड या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही आधी सुरवात केली आहे. तसेच त्याबाबतच अर्ज देखील आधी केला आहे. त्यामुळे सिरमने कोव्हिशिल्ड या ट्रेडमार्कचा वापर करून लस बाजारात आणली तर त्यातून होणारा नफा क्‍युटीसला द्यावा. कारण तशी तरतूद ट्रेडमार्क ॲक्‍ट १९९९ मध्ये आहे, अशी माहिती क्‍युटीसचे वकील सोनी यांनी दिली.

सिरमला न्यायालयाची नोटीस

क्‍युटीसने दाखल केलेल्या दाव्यानंतर न्यायालयाने सिरमला नोटीस बजावली आहे. तुमच्या विरोधात दावा दाखल झाला आहे. त्यात ट्रेडमार्क वापरण्याबाबत हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत मनाई आदेश का देऊ नये? यावर तुमचे म्हणणे मांडा असे त्या नोटिसीत नमूद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

या आहेत क्‍युटीसच्या मागण्या

- सिरमने लसीचे नाव बदलावे

- कोव्हिशिल्ड ट्रेडमार्कचा वापर करून मिळवलेला नफा क्‍युटीसला द्यावा

- कोव्हिशिल्ड नावाशी मिळते-जुळते नाव सिरमने वापरू नये

- सिरमने कोव्हिशिल्ड ट्रेडमार्क मिळण्याबाबत केलेला अर्ज परत घ्यावा

Web Title: A dispute over covishield is now in commercial court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.