नांदेड जिल्ह्यातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची होणार वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:25 AM2018-02-08T00:25:56+5:302018-02-08T00:26:08+5:30

मागील अनेक वर्षांपासून थकित असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या पाणीपुरवठा योजनेतील ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख तर पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकित वीजबिल असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद तसेच महानगरपालिकांनी त्यांच्याकडील वीजबिलांचा त्वरित भरणा करुन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Disrupted water supply schemes in Nanded district will be dissolved | नांदेड जिल्ह्यातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची होणार वीज खंडित

नांदेड जिल्ह्यातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची होणार वीज खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरण : ४१ हजार ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख थकबाकी


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील अनेक वर्षांपासून थकित असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या पाणीपुरवठा योजनेतील ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख तर पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकित वीजबिल असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद तसेच महानगरपालिकांनी त्यांच्याकडील वीजबिलांचा त्वरित भरणा करुन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्या वतीने वारंवार सूचना देवूनही परिमंडळातील स्थानिक स्वराज्य संस्था थकित वीजबिलांचा भरणा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा वीजग्राहकांकडे डिसेंबर २०१७ अखेर १०६ कोटी ७३ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यामध्ये नांदेड शहर विभागातील पाणीपुरवठा वीजग्राहकांकडे ३ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
तसेच कंधारमध्ये १० कोटी पाच लाख, लोहा तालुक्यात १३ कोटी ७३ लाख, मुदखेडमध्ये ५ कोटी ४० लाख तसेच बिलोलीमधील ग्राहकांकडे ३ कोटी ८२ लाख, देगलूरमध्ये १९ कोटी ९३ लाख, धर्माबाद- ३ कोटी ९४ लाख, मुखेड - १३ कोटी १६ लाख, नायगाव- ६ कोटी ४७ लाख, भोकर -४ कोटी ३१ लाख, हदगाव- ८ कोटी ३७ लाख, हिमायतनगरमध्ये ३ कोटी ३४ लाख, किनवट- ४ कोटी चार लाख, माहूरमधील ग्राहकांकडे ७७ लाख तर उमरी उपविभागातील वीजग्राहकांकडे ३ कोटी ८३ लाख रूपये तर नांदेड जिल्ह्यात पथदिव्यांची १७७ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
पाणीपुरवठा आणि पथदिवे वीजग्राहकांकडील थकबाकी हा महावितरणसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून दिवसेंदिवस ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढतच चालला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी थकबाकी बिलासह चालू देयकांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख थकले
नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील पथदिवे ग्राहकांकडे एकूण ३३५ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. तसेच घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा लक्षात घेता महावितरणच्या वतीने परिमंडळात विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वारंवार सूचना देवूनही बिलांचा भरणा न करणा-या वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून ग्राहकांना वेळेवर बिलांचा भरणा करण्याचे आवाहन केले जात आहे.

Web Title: Disrupted water supply schemes in Nanded district will be dissolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.