खेळाडूंना ग्रेड बेल्ट प्रमाणपत्र वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:01+5:302021-08-12T04:23:01+5:30
वीर कराटे मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष सेन्साई मनोज पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षण खेळाडूंनी पूर्ण केले. जी.के. स्पोर्टस् लातूरचे ...
वीर कराटे मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष सेन्साई मनोज पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षण खेळाडूंनी पूर्ण केले. जी.के. स्पोर्टस् लातूरचे ट्रेनर सेन्साई गणेश काकडे यांनी खेळाडूंना आधुनिक स्पोर्ट कराटेमधील काता, कुमितेचे प्रशिक्षण दिले. अध्यक्षस्थानी होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. संतोष जटाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. खरे, डॉ. साई, बाबासाहेब सुतारे, विजय रापतवार, सेन्साई गणेश काकडे, योगेश डोंगरे, सेन्साई गजानन गोंटलवार, सेन्साई संतोष नांगरे, सेन्साई शेख मोईन आदी उपस्थित होते.
यशस्वी खेळाडूत यलो बेल्ट - बुद्धभूषण लांडगे, ध्रुव राजूरकर, नमन भावले, स्वप्नील जाधव, वेदांत मुळी, विश्वजित वाघमारे, सोहम हंकारे, श्रेयशी गायकवाड. ऑरेंज बेल्ट- वेदांत कल्याणकर, गिरिराज पदमवार, विनायक चौधरी, पार्थ कवठेकर, आदित्य चक्रवार, सोहम बचेवार, स्वप्नील जाधव, शिव नागठाणे, रुद्र पाठक, श्रेया जोंधळे, महेश चिंटोळे, धीरज परीवाले, श्रावणी कवठेकर, नमिता ठाकूर, स्वराज जाधव, रवी पूर्णिक, अमृता पात्रे. रेड बेल्ट - राजवीर स्वामी, जान्हवी रोडे, सदानंद भालेराव, लक्ष्मी चिंटोळे, रवी पूर्णिक, तेजश लाठकर. ग्रीन बेल्ट - प्रसाद स्वामी, हरिओम सोर्गे, प्रांजली कल्याणकर, व्यंकटेश तांबोळी. ब्लू बेल्ट - सृष्टी अशोकराव पांचाळ यांना ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगम बोरकर, संजीवनी बोरकर, श्रद्धा देशमुख, विनीत टेकाळे, सृष्टी पांचाळ यांनी परिश्रम घेतले. ग्रेड बेल्ट, प्रमाणपत्र मिळविलेल्या सर्व खेळाडूंचे आरपीआय आ. खेल प्रकोष्ट स्पोर्ट विंगचे राष्ट्रीय सहसचिव प्रदीप जाधव, राज्याध्यक्ष राजू दवणे, राज्य महासचिव अरविंद साळवे, प्रीतम गाडे (मुंबई अध्यक्ष) व सर्व पदाधिकारी व क्रीडाप्रेमींनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष नांगरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन मनोज पतंगे यांनी केले.