जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:45 AM2019-03-20T00:45:58+5:302019-03-20T00:46:30+5:30

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रावर विविध सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

District 8 thousand 514 Divyan voters | जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार

जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार

Next
ठळक मुद्देनिवडणूक : मतदान केंद्रावर राहणार प्रथमोपचार पेटी

नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ८ हजार ५१४ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान केंद्रावर विविध सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी यंदा सुलभ निवडणूक प्रक्रिया हे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या ८ हजार ५१४ दिव्यांग मतदारांपैकी हिंगोली मतदार संघातील किनवट विधानसभा मतदार संघात ८७७ तर हदगाव मतदारसंघात ६८० दिव्यांग मतदार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील लोहा विधानसभा मतदारसंघात १ हजार ५६४ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. हे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचावेत, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने मतदान केंद्रावर सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी प्रथमोपचार पेटीही ठेवली जाणार आहे. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील वोटर स्लीप दिली जाणार आहे.
सर्व्हीस वोटरसाठी आॅनलाईन मतपत्रिका
जिल्ह्यात असलेल्या सर्व्हीस वोटरसाठी आॅनलाईन मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या सर्व्हीस वोटरमध्ये सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या पत्नी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २ हजार ५६४ सैनिक, माजी सैनिक आहेत. या सर्व्हीस वोटरसाठी यंदा निवडणूक विभागाने आॅनलाईन मतपत्रिका उपलब्ध करुन दिल्या आहेत.या मतपत्रिकांची प्रिंट घेवून सदर मतदार आपले मतदान पोस्टाने पाठवू शकणार आहेत. या सुविधेने सर्व्हीस वोटरच्या मतदानाचे प्रमाण वाढेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

Web Title: District 8 thousand 514 Divyan voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.