जिल्हा बँकेने अतिवृष्टीच्या अनुदानाचे जलदगतीने वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:39+5:302020-12-22T04:17:39+5:30
कुंडलवाडी व आजूबाजूला असलेल्या महसूल मंडलातील गावातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान ...
कुंडलवाडी व आजूबाजूला असलेल्या महसूल मंडलातील गावातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकड़े ४ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले. बँकेने अल्फाबेटिकप्रमाणे उलटे झेड पासून ए प्रमाणे गावाची यादी करून अनुदान वाटप करत आहे. २१ डिसेंबरपर्यंत ६३ लाख रुपयाचे वाटप झाले असून यात येसगी ३८१ शेतकरी १५.०४ लक्ष रुपये, वलियाबाद ४०० शेतकरी १४.१५ लक्ष रुपये, टाकळी (थडी ) २०० शेतकरी ५.७५ लक्ष रुपये, सुलतानपूर ४१० शेतकरी १४.८८ लक्ष रुपये या गावांचा समावेश होता. ५ गावाच्या शेतकऱ्यांनी आपले अनुदान उचलले आहेत. पुढील २४ गावाच्या अनुदानाचे वाटप सोशल डिस्टनस ठेवत जलदगतीने चालू आहे असे बँकेचे मॅनेजर जी.डी.कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.