जिल्हा बँकेचे मतदार सहलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:12+5:302021-03-31T04:18:12+5:30
मतदार संघनिहाय मतदारांची संख्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्धापूर तालुक्यात २९, उमरी- ५५, कंधार-७०, किनवट- ७०, देगलूर-९१, धर्माबाद- ...
मतदार संघनिहाय मतदारांची संख्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्धापूर तालुक्यात २९, उमरी- ५५, कंधार-७०, किनवट- ७०, देगलूर-९१, धर्माबाद- १०, नांदेड- १३६, नायगाव- ८३, माहूर-२५, बिलोली-६३, भोकर- ४९, मुखेड- ६९, मुदखेड- ४५, लोहा-७३, हदगाव- ७४ तर हिमायतनगर तालुका मतदार संघात मतदार संख्या शून्य आहे. या मतदार संख्येत सहकार, पतसंस्था व इतर मतदारांच्या संख्येच्या समावेश आहे.
हिमायतनगरात मतदार शून्य मात्र उमेदवार दोन
हिमायतगर तालुका मतदार संघात एकही उमेदवार नसला तर येथून अनुराधा अनिल पाटील व विजयाबाई देवराव शिंदे या उमेदवार आहेत. सदर मतदार संघ हा महिलेसाठी राखीव आहे. या दोन महिला उमेदवारांना जिल्हाभरातील एकूण ९४२ मतदारांना मतदान करता येणार आहे. अनुराधा पाटील ह्या भाजपाप्रणित सहकार विकास पॅनलच्या उमेदवार आहेत तर विजयाबाई शिंदे ह्या महाआघाडी प्रणित समर्थ विकास पॅनलच्या उमेदवार असून त्यांच्यात चुरशीची लढत होत आहे.