तृतियपंथियांच्या आधारापासून ते स्मशानापर्यंतच्या समस्यांवर जिल्हाधिकार्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:28+5:302021-03-27T04:18:28+5:30
यावेळी उपस्थित तृतियपंथियांनी “साहेब आम्हाला आधारकार्ड मिळत नाही, आम्हाला रेशनकार्ड नाही, इलेक्शन कार्ड नाही” अशी व्यथा मांडली. तसेच ही ...
यावेळी उपस्थित तृतियपंथियांनी “साहेब आम्हाला आधारकार्ड मिळत नाही, आम्हाला रेशनकार्ड नाही, इलेक्शन कार्ड नाही” अशी व्यथा मांडली. तसेच ही कागदपत्रे नसल्याने आम्हाला नोकरीची संधी मिळत नाही, शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आम्हाला हे कार्ड मिळतील का? असा साधा प्रश्न जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना हेलावून गेला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.इटणकर यांनी त्यांचय्ा समस्या ऐकूण घेत असताना तुम्हाला सेतू केंद्र चालवायला आवडेल का अशी थेट विचारणा केली. यासाठी तुम्हाला संगणक शिकावे लागेल. हे शिक्षणही आम्ही तुमच्यासाठी सहज उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांचे बोल एकून सर्व उपस्थितांना आनंद झाला.
जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांना त्यांच्या निवडणूक कार्डासाठी, जिल्हा पुरवठा विभागाचे प्रमुख शरद मंडलीक यांना त्यांच्या रेशनकार्ड आणि आधारकार्डासाठी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांना त्यांनी सूचना करुन यावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सांगितले. तसेच स्मशानभूमी आणि राहयला जागा उपलब्ध करून देण्याबाबतही लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.