जिल्हा हिवताप हंगामी फवारणी कर्मचारी जिल्हाध्यक्षपदी वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:23+5:302021-03-21T04:17:23+5:30
अनुराधा ढालकरी यांच्याकडे बिलोलीचा पदभार नांदेड- बिलोली येथील उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याकडे सोपविण्यात ...
अनुराधा ढालकरी यांच्याकडे बिलोलीचा पदभार
नांदेड- बिलोली येथील उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बिलोली येथील उपजिल्हाधिकारी यांचे पद पाच महिन्यांपासून रिक्त आहे. तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार ही दोन्ही पदे सांभाळताना शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच तहसीलदार वाघमारे यांनी उपजिल्हाधिकारीपदाचा पदभार घेतल्यानंतर चारशेपेक्षा अधिक जणांना जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याची व त्याची विभागीय आयुक्तांकडे चौकशी करण्याची तक्रार माहिती अधिकार संरक्षण समितीचे संस्थापक जाकीर शेख यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. तसेच वाघमारे यांच्याकडील उपजिल्हाधिकारी पदाचा पदभारही काढण्याची मागणी केली होती.