एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप, सध्याचे तापमान ४० अंशाच्या घरात, भविष्यात ४५ पर्यंत जाण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:17 AM2021-04-02T04:17:40+5:302021-04-02T04:17:40+5:30

सध्या जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. परंतु, ५ एप्रिलला लॉकडाऊन शिथिल होणार आहे. मात्र, ५ ...

The district's temperature is expected to rise in April, with current temperatures hovering around 40 degrees Celsius, projected to rise to 45 in the future | एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप, सध्याचे तापमान ४० अंशाच्या घरात, भविष्यात ४५ पर्यंत जाण्याचा अंदाज

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप, सध्याचे तापमान ४० अंशाच्या घरात, भविष्यात ४५ पर्यंत जाण्याचा अंदाज

googlenewsNext

सध्या जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. परंतु, ५ एप्रिलला लॉकडाऊन शिथिल होणार आहे. मात्र, ५ एप्रिलपासूनच उन्हातदेखील वाढ होणार आहे. नांदेडचा पारा ४४ ते ४५ अशांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काळजी घेणे त्याचबरोबर उष्माघात होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाययोजनाही प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

पुढील आठवड्यात घ्या विशेष काळजी

यंदाचा एप्रिल महिना तापदायक ठरणार आहे. त्यात हवामान अभ्यासकांनी ५ ते १६ एप्रिलपर्यंत उन्हाचा कडाका राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या काळात प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक दुपारी घराबाहेर पडू नये अथवा दुपारी उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये, यातून उष्माघाताची दाट शक्यता असते. या काळात तापमान ४५ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे स्वत:चे तसेच पशुपक्षी, जनावरे, पाळीव प्राणी, पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, असे आवाहन हवामान अभ्यासक बालासाहेब कच्छवे यांनी केले आहे.

Web Title: The district's temperature is expected to rise in April, with current temperatures hovering around 40 degrees Celsius, projected to rise to 45 in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.