माहूर तहसीलवर दिव्यांगांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:27 AM2019-05-28T00:27:34+5:302019-05-28T00:29:23+5:30

अंध, अपंग वृद्ध व शेतमजूर यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने चालढकल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. बच्चू कडूप्रणीत प्रहार अपंग क्रांती संघटना नांदेड व तालुका शाखा माहूरच्या वतीने २७ मे रोजी सकाळी ११ वा. कपिलेश्वर धर्मशाळा ते माहूर तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.

Divyananga's Front agitate at Mahur Tehsil | माहूर तहसीलवर दिव्यांगांचा मोर्चा

माहूर तहसीलवर दिव्यांगांचा मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्दे४४ अंश सेल्सिअस तापमानात निघाला मोर्चा मागणी केल्यानंतर प्रशासनाकडून पाण्याची व्यवस्था

श्रीक्षेत्र माहूर : अंध, अपंग वृद्ध व शेतमजूर यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने चालढकल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. बच्चू कडूप्रणीत प्रहार अपंग क्रांती संघटना नांदेड व तालुका शाखा माहूरच्या वतीने २७ मे रोजी सकाळी ११ वा. कपिलेश्वर धर्मशाळा ते माहूर तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.
यावेळी माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर व माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहाण यांनी मोर्चाला सामोरे जावून पाच दिवसांत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याशिवाय दिव्यांगांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यास कारणीभूत आपाआपल्या अखत्यारितील कर्मचाऱ्याविरुद्ध तत्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख पिंपळगावकर, जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना विठ्ठलराव मंगनाळे, राजेश बेळगे, गणेश पाटील बाळासाहेब डाकोरे, माहूर तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर, विद्या चव्हाण, वैशाली शेंडे, सुनीता गरड, विकी मोरे, एकनाथ मानकर आदींनी केले. मोर्चात जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष व नांदेड जिल्हा प्रहार अपंग क्रांती संघटना व माहूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांगांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याबाबत राज्यकर्त्याकडून सातत्याने हमी दिल्या जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी प्रशासन यंत्रणा मात्र दिव्यांगांचे प्रश्न, सोडविण्याच्या कामास उदासीनता दाखवीत असल्याने दिव्यांगांचे अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. अपंग कायद्याची अंमलबजावणी करा, ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांना ३ टक्के व ५ टक्के मानधन त्वरित वाटप करा, ग्रामपंचायतमध्ये जन्म- मृत्यू नोंद रजिस्टरप्रमाणे दिव्यांगांच्या अद्ययावत नोंदी घ्या, दिव्यांगांना व्यवसायासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा उपलब्ध करून द्याव्या, दिव्यांगांना गृहकरामध्ये ५० टक्के सूट द्यावी, घरकुलाचा लाभ द्यावा, विनाअट शौचालये बांधून द्यावी, अपंगांच्या बचत गटास अर्थसहाय करावे, ५० हजारांच्या उत्पनाचे प्रमाणपत्र विनाअट द्यावे दिव्यांगासाठी व्हीलचेअर खरेदी केलेल्या ग्रा.पं.ची यादी द्यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.
यावेळी माहूर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव परित्यक्ता, विधवा, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक मोर्चेकऱ्यांना उन्हाचा त्रास होत असल्याने संघटनेच्या नेत्यांनी मोर्चेकरी दिव्यांग असल्याचे माहीत असतानासुद्धा प्रशासनाने साधे पिण्याचे पाण्याचीसुद्धा व्यवस्था न ठेवल्याने तहसीलदारांना जाब विचारला, तेव्हा ऐनवेळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली.
या होत्या दिव्यांगांच्या मागण्या
दिव्यांगांना ३ टक्के व ५ टक्के मानधन त्वरित वाटप करा, ग्रा़प़ंमध्ये जन्म- मृत्यू नोंद रजिस्टरप्रमाणे दिव्यांगांच्या अद्ययावत नोंदी घ्या, दिव्यांगांना व्यवसायासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी जागा उपलब्ध करून द्यावी, दिव्यांगांना गृहकरामध्ये ५० टक्के सूट द्यावी, घरकुलाचा लाभ द्यावा, विनाअट शौचालये बांधून द्यावी.
अपंगांच्या बचत गटास अर्थसहाय करावे, ५० हजारच्या उत्पनाचे प्रमाणपत्र, विनाअट द्यावे तसेच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर खरेदी केलेल्या ग्रा.पं.ची यादी द्यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या़ तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव परित्यक्ता, विधवा,शेतमजुरांनी मोर्चात सहभाग घेतला़ यावेळी अनेक मोर्चेकºयांना उन्हाचा त्रास झाला़

Web Title: Divyananga's Front agitate at Mahur Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.