ग्रामपंचायतीसमोर दिव्यांगांचे थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:37+5:302021-07-08T04:13:37+5:30
दिव्यांग ॲपमध्ये नोंदणीपासून दिव्यांग वंचित राहू नये, म्हणून जिल्हाधिकारी यांनी अनेकदा वेळापत्रक देऊनही अकरा महिन्यांमध्ये दिव्यांगाना माहिती न देता ...
दिव्यांग ॲपमध्ये नोंदणीपासून दिव्यांग वंचित राहू नये, म्हणून जिल्हाधिकारी यांनी अनेकदा वेळापत्रक देऊनही अकरा महिन्यांमध्ये दिव्यांगाना माहिती न देता संबंधित आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अर्थात दिव्यांगांना निधी व हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पंचायत समितीच्या अंतर्गत दिव्यांगांचा ५ टक्के निधी अनुशेषासह वाटप न करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ग्रामपंचायतीचा दिव्यांग राखीव ५ टक्के स्वनिधी चौदावा, पंधरावा विकास निधीतून २०१६ ते आजपर्यंत राखीव दिव्यांगाचा निधी न देणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन तो निधी वाटप करण्यात यावा, दिव्यांगांना घरकुल योजनेतून प्राधान्याने गावातील रिकाम्या जागेत घरकुल देण्यात यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात दिव्यांग, वृद्ध आणि निराधार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे व तालुकाध्यक्ष गजानन हंबर्डे यांच्यासह काळबा सातपुते, दत्ता हंबर्डे, शिवाजी हंबर्डे, सीताराम पांचाळ, शेरखान पठाण, अजमत पठाण, दीपक उबाळे, ज्ञानेश्वर कंधारे, त्रिशला इंगोले, पूजा बगाटे आणि शिवाजी गवारे आदी दिव्यांग व्यक्तींचा प्रामुख्याने सहभाग होता. दरम्यान, सरपंच प्रतिनिधी तथा विष्णूपुरी येथील माजी सरपंच राजू उर्फ विलास हंबर्डे-देशमुख यांनी दिव्यांग आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.