दिवाबत्तीची देखभाल होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:30 AM2019-01-11T00:30:28+5:302019-01-11T00:31:17+5:30

शहरातील दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठप्प झाले असून, हे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचे ९६ लाख रुपये थकल्याने ठेकेदाराने या कामातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Do not worry about diwali | दिवाबत्तीची देखभाल होईना

दिवाबत्तीची देखभाल होईना

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका : थकित देयकापोटी ठेकेदाराने घेतला काढता पाय

नांदेड : शहरातील दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठप्प झाले असून, हे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचे ९६ लाख रुपये थकल्याने ठेकेदाराने या कामातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संपूर्ण शहरात एलईडी बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद असल्याने नगरसेवक तक्रारी करीत आहेत. मात्र नवे पथदिवे बसविण्यात येणार असल्याचे कारण सांगून हे पथदिवे दुरुस्त करण्यात आले नाही. त्यात आता शहरात दिवाबत्ती देखभाल दुरुस्ती करणाºया सोनू इलेक्ट्रीकलने या कामातून माघार घेतली आहे. सोनू इलेक्ट्रीकलला महिनाभरापूर्वी महापालिकेने मुदतवाढ दिली होती. मात्र पूर्वीचीच रक्कम थकित असल्याने सोनू इलेक्ट्रीकलने महिनाभराची मुदतवाढ संपताच हे काम आपण करणार नसल्याचे महापालिकेला कळविले आहे. महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात आता एशियन इलेक्ट्रीकल या ठेकेदारास देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सोपविले आहे.
ऐनवेळी झालेला हा बदल शहरवासियांना अंधारात टाकणारा आहे. आजघडीला व्हीआयपी रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद आहेत. तसेच अण्णाभाऊ साठे चौक ते चिखलवाडी या रस्त्यावरील काही दिवे बंद आहेत. वसरणी ते साईबाबा कमान या मुख्य रस्त्यावरील दिवे बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सिडको रस्त्याचे काम सुरु असल्याने या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे. स्थानिक नगरसेविकेने बंद असलेल्या पथदिव्यांबाबत मनपाला पत्र देवूनही बंद असलेले दिवे सुरु करण्यात आलेच नाहीत.
सिडको-हडको, तरोडा या भागात पथदिव्यांची प्रचंड वाणवा असून वारंवार सांगूनही पथदिवे दुरुस्त केले जात नसल्याचे नगरसेवकांनी अनेकदा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले.शहरात दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा १२ लाख रुपये महापालिका खर्च करत आहे.
पाणीपुरवठ्यासाठी शहरात महापालिकेचे १३ पंपगृह आहेत. या पंपगृहावर मोठ्या प्रमाणात वीज लागते. महापालिकेच्या दिवाबत्ती विभागाकडून वीजबिल कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांनी सांगितले. शहरात एलईडी तसेच टायमिंग अल्टरवेट बसवून वीजबिल कमी केले जाणार आहे. उत्तर नांदेडात जवळपास ११२ ठिकाणी महापालिकेने आॅटोमॅटिक टायमर बसविले आहेत.
दरम्यान, शहरात दोन हजाराहून अधिक एलईडी दिवे लावण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले होते. दोन टप्प्यात हे काम केले जाणार होते. प्रत्यक्षात मात्र दोन महिन्यानंतरही हे काम सुरु झाले नाही. नवीन नांदेडला जोडणाºया रस्त्यावरही दिवे बसविण्यासाठी १३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नवीन नांदेडातील हे काम अद्यापही सुरु झाले नाही.
मनपाकडे महावितरणचीही मोठी थकबाकी
महापालिकेकडे वीज बिलापोटी महावितरणची मोठी थकबाकी आहे. पाणीपुरवठ्याच्या देयकापोटी २८ आणि पथदिव्यांचे वीजबिल २ कोटी असे जवळपास ३० कोटी रुपये थकित आहेत. पथदिव्यांसाठी महापालिकेला दरमहा जवळपास ८० ते ९० लाख रुपये वीजबिल अदा करावे लागते. तर पाणीपुरवठ्यासाठी ८५ लाख रुपये वीजबिल दरमहा अदा करावे लागते. हे बिल थकित असल्याने महावितरणने कारवाईचा बडगाही अनेकदा उगारला आहे. वीज बिलाचा हा आकडा मोठा असल्याने सदर वीज वापराची तांत्रिक माहिती देण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.

 

Web Title: Do not worry about diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.