जनविकास पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:18+5:302021-02-05T06:08:18+5:30
बॅटऱ्या लंपास भोकर - तालुक्यातील उमरी मार्गावर असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या ३४ हजार रुपयांच्या १७ बॅटऱ्या चोरट्यांनी लांबविल्या. २९ ...
बॅटऱ्या लंपास
भोकर - तालुक्यातील उमरी मार्गावर असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या ३४ हजार रुपयांच्या १७ बॅटऱ्या चोरट्यांनी लांबविल्या. २९ जानेवारी रोजी ही घटना घडली. चोरट्यांनी रुममधील शटरची लोखंडी पट्टी लांबवून बॉक्समध्ये असलेल्या बॅटऱ्या लंपास केल्या. याप्रकरणी रामेश्वर सुगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
वाळूची चोरी
देगलूर - तालुक्यातील वन्नाळी गावातील मारूती मंदिरासमोर साठा करून ठेवलेली अवैध वाळू जप्त करण्यात आली. पोलिसांनी १ ब्रास वाळू, दोन फावडे टोपले असा ऐवज जप्त केला. पोलीस तपास करीत आहेत.
आरक्षण सोडत
लोहा - तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे ही सोडत होणार असल्याची माहिती देण्यात आली. सर्व संबंधितांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले.
केंद्रे यांना निरोप
मांडवी - येथील पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष केंद्रे व जमादार वैजनाथ मोटरगे यांना बदली झाल्यामुळे निरोप देण्यात आला. जि.प. सदस्य मधुकर राठोड, सरपंच हिराबाई सिडाम यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी नूतन सपोनि मल्हार शिवरकर यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन माधव शेंद्रे यांनी तर प्रास्ताविक सुनील तिरमनवार यांनी केले.
बालकांना मात्रा
फुलवळ - येथील अंगणवाडी १ व २ मध्ये ३१ जानेवारी रोजी बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी तसेच आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
लक्ष्मणशक्ती कार्यक्रम
बोधडी - येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात ३१ जानेवारी रोजी सकाळी लक्ष्मणशक्तीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सुरू झाला. रविवारी सायंकाळी कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमास परिसरातील भाविकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मोफत नेत्र तपासणी
भोकर - नमस्ते सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक न्यायभवन इमारतीसमोर रविवारी झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात गरजूंची तपासणी करून चष्म्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी न्या.शेख, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, न्या.मंदार पांडे, न्या. बी.ए. तळेकर यांची उपस्थिती होती.
दोन दिवसीय शिबिर
किनवट - तालुक्यातील सिंदगी (मो.) येथे १ व २ फेब्रुवारी रोजी समता सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटक म्हणून इंजि. प्रशांत ठमके तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.व्ही.एगडे, एम.एम.शिंदे, गजभारे, राहुल उमरे आदी उपस्थित होते.
गोरठकर यांचा सत्कार
नायगाव - रुई ता.नायगाव येथील भारतीय सेनेत भास्कर गोरठेकर यांचा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी दंडेवाड, बालाजीराव हळदेवाड, संभाजीराव तुरटवाड आदी उपस्थित होते.
गोदामाचा शुभारंभ
नायगाव - कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव येथील मिरची मार्केट यार्डातील लालवाडी रोड येथे १ हजार मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यात आले. गोदामाचा शुभारंभ माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी माधवराव बेळगे, मोहन पाटील, जिल्हा उपनिबंधक डॉ. अमोल यादव, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, सहाय्यक निबंधक सुनील गनलेवार आदी उपस्थित होेते.
पूजा यांची निवड
नायगाव - बरबडा येथील पूजा गंगाधर भुसलवाड हिची भारतीय सैनिक दल आसाम रायफल्समध्ये निवड झाली. पूजा ही जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यानिमित्त तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, सचिव नारायणराव सर्जे, शिवाजीराव धर्माधिकारी, उपमुख्याध्यापक अक्कलवाड, गंगाधरराव भुसलवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.टी. बरबडेकर यांनी तर आभार एन.के.आकलवाड यांनी मानले.