गोवर्धनघाट येथे १० हजार गोवऱ्यांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:57+5:302021-05-06T04:18:57+5:30
अंत्यसंस्कार करताना लाकडे, गोवऱ्या व इतर साहित्याचा वापर केला जातो. परंतु सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असे संस्कार आपण करू शकत ...
अंत्यसंस्कार करताना लाकडे, गोवऱ्या व इतर साहित्याचा वापर केला जातो. परंतु सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असे संस्कार आपण करू शकत नाही. त्यानुषंगाने एक सामाजिक बांधिलकी व माणुसकीच्या नात्याने श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पाचे संस्थापक तथा उद्योजक मारोतराव कंठेवाड यांच्या पुढाकाराने आणि संस्था अध्यक्षा सविता कंठेवाड यांनी ही मदत केली.
शांतीधाम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. साजने, विजय मालपानी, एम. आर. जाधव, श्रीनिवास इनामदार या सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून गोवऱ्यांचे दान करण्यात आले. श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पाचे व्यवस्थापक शुभम भुरेवार, विलास वाळकीकर, सुरेखा बास्टे, अविनाश देवकांबळे, तुषार भुरेवार, मारोती वडजे, सुचित झिंजाडे यांनी शांतीधामचे व्यवस्थापक नरसिंग गायकवाड व गंगुताई गायकवाड यांच्याकडे १० हजार गोवऱ्या सुपुर्द केल्या.