डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:23 AM2018-10-28T01:23:47+5:302018-10-28T01:24:47+5:30

३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़

DP burnt: Electricity supply of eighteen villages disrupted | डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित

डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
निवघा बाजार : ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़
रबी हंगामातील हरभरा पेरणीसाठी शेतकरी रान भिजवत आहेत़ तर काही शेतकरी हरभरा पिकाची उगवण झाली, अशा पिकांना पाणी देत आहेत़ परंतु, मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती जमिनीतील पेरण्या खोळंबल्या तर उगवलेले हरभरा सुकून जात आहे़ याबाबत वीज कर्मचाºयांशी विचारणा केली असता परिसरातील १८ गावांना वीजपुरवठा करणारे सबस्टेशनचे रोहित्र जळाले असून आणखी वीजपुरवठा सुरळीत होण्यास आठ दिवस तरी लागतील़, असे त्यांनी सांगितले़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़ ज्या गावातील डीपी नादुरुस्त आहेत त्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही शेतक-यांनी केली आहे.
बळेगावातील दोन्ही डीपी जळाल्या
उमरी : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील बळेगाव येथील महावितरणच्या दोन्ही डीपी जळाल्यामुळे दहा दिवसांपासून पाण्याअभावी पिके वाळून जात आहेत. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.महावितरणकडे नवीन डीपीची उपलब्धता नसल्यामुळे आठवडाभरात डीपी बसण्याची शक्यता नाही. ऊस, हळद , भाजीपाला या पिकांसाठी शेतकºयांनी मोठा खर्च केला. मात्र ही पिकेही वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.यासंदर्भात शेतक-यांनी महावितरणकडे अनेकवेळा लेखी तक्रारी केल्या मात्र अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. येत्या दोन दिवसांत बळेगावातील दोन नवीन डीपी बसविण्यात यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच सय्यद हुसेन यांनी दिला आहे.

Web Title: DP burnt: Electricity supply of eighteen villages disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.