डॉ. आंबेडकरांनी माणूस नावाच्या सौंदर्याची निर्मिती केली - भदन्त पंय्याबोधी थेरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:03+5:302020-12-08T04:15:03+5:30

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण ...

Dr. Ambedkar created a beauty called Manus - Bhadant Panyabodhi Thero | डॉ. आंबेडकरांनी माणूस नावाच्या सौंदर्याची निर्मिती केली - भदन्त पंय्याबोधी थेरो

डॉ. आंबेडकरांनी माणूस नावाच्या सौंदर्याची निर्मिती केली - भदन्त पंय्याबोधी थेरो

Next

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खुरगाव येथे ‘महामानवाला कवितेतून अभिवादन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कविसंमेलनात पंचफुला वाघमारे, थोरात बंधू, अनिकेत कुलकर्णी, विकास कदम, शंकर नरवाडे, राजेश गायकवाड, मारोती कदम, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, रणजित गोणारकर, रूपाली वैद्य वागरे, नागोराव डोंगरे, कैलास धृतराज, निवृत्ती लोणे, गंगाधर ढवळे, सुभाष लोकडे, सुदामा हिंगोले, पांडुरंग कोकुलवार, अनुरत्न वाघमारे यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Dr. Ambedkar created a beauty called Manus - Bhadant Panyabodhi Thero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.