डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिले समाजशास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:21 AM2019-04-18T00:21:29+5:302019-04-18T00:22:52+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.
नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले हे होते. तर कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाती विश्लेषण’ या विषयावर बोलताना प्रा. कोसंबी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी वेचले. भारताच्या विकासासाठी झटले. भारतातील जातीव्यवस्था हा विकासातला मोठा अडसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच, प्रत्यक्ष व्यवहारातून जात निघून जाण्यासाठी त्यांनी कार्य केले. जातीकडे त्यांनी कूट प्रश्न म्हणून पाहिले. अनुभवजन्य ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते जाती व्यवस्थेचे मूल्यांकन करु शकले. कारण जात ही आपसूकपणे आपली स्व:ची व्यवस्था निर्माण करत असते. असमानतेवर आधारित असलेली जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून त्यांनी मोठे कार्य केले.
प्रास्ताविक डॉ. पी. विठ्ठल यांनी तर डॉ. गजानन झोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. राम जाधव, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ.वीरा राठोड, डॉ योगिनी सातारकर, विश्वाधार देशमुख, उद्धव हंबर्डे, डॉ. भीमराव हटकर, सुनील ढाले, माधव जायभाये, संदीप एडके, विनायक येवले आदींची उपस्थिती होती़