डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे आहेत तसेच समजावून घेतले असते तर हा देश महान झाला असता – यशवंत मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:01+5:302020-12-08T04:15:01+5:30

डॉ. मनोहर म्‍हणाले की, डॉ. आंबेडकर असे फिलॉसॉफर होते. ज्‍यांनी केवळ व्‍यवस्‍थाच नाकारली असे नाही. तर ज्‍या तत्त्वव्‍यूव्‍हावर व्‍यवस्‍था ...

Dr. If Babasaheb Ambedkar had been explained as he is, this country would have become great - Yashwant Manohar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे आहेत तसेच समजावून घेतले असते तर हा देश महान झाला असता – यशवंत मनोहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे आहेत तसेच समजावून घेतले असते तर हा देश महान झाला असता – यशवंत मनोहर

Next

डॉ. मनोहर म्‍हणाले की, डॉ. आंबेडकर असे फिलॉसॉफर होते. ज्‍यांनी केवळ व्‍यवस्‍थाच नाकारली असे नाही. तर ज्‍या तत्त्वव्‍यूव्‍हावर व्‍यवस्‍था उभी असते ते नाकारण्‍याचे धाडस केले. त्‍यांनी आपल्‍या विचारांना पोथीनिष्‍ठेत बंद होऊ दिले नाही किंवा मूलतत्त्ववादात आपल्‍या व्‍यक्तिमत्त्वाला जाऊ दिले नाही. कोणत्‍याही बौद्धिक तत्त्वज्ञानात न मावणारे ते महापुरुष होते. मात्र, आपण आपल्‍या सोयीने त्‍यांना स्‍वीकारले. त्‍यामुळे अद्यापही आमूलाग्र बदल शक्‍य झाले नाहीत. त्‍यांना पूर्णपणे स्‍वीकारले असते तर एक व्‍यक्‍ती, एक मूल्‍य हे नैतिक वास्‍तव जन्‍माला आले असते. आजच्‍या विलक्षण काळात त्‍यांचा सन्‍मान करायचा असेल किंवा आपल्‍याला समतामय भारत निर्माण करायचा असेल तर आपण सर्वांनी आपल्‍यातली विषमता शोषण, अहंकार नष्‍ट करून आपण करुणावंत झालो पाहिजे, असे ते म्‍हणाले.

प्रारंभी अध्‍यासन केंद्राचे समन्‍वयक, डॉ. पी. विठ्ठल यांनी या प्रास्‍ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. सर्जेराव शिंदे, डॉ. रवी सरोदे, डॉ. डी. एम. खंदारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. If Babasaheb Ambedkar had been explained as he is, this country would have become great - Yashwant Manohar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.