'डॉ. प्रकाश बाबा आमटे' चित्रपटात नांदेडच्या कुणालची महत्त्वपूर्ण भूमिका
By admin | Published: October 21, 2014 01:35 PM2014-10-21T13:35:42+5:302014-10-21T13:35:42+5:30
'डॉ. प्रकाश बाबा आमटे' द रिअल हीरो या चित्रपटामध्ये स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली. तसेच नांदेड येथील कलावंत कुणाल गजभारे यांनी मुख्य नक्षलवाद्याची भूमिका पार पाडली.
Next
>नांदेड : 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' द रिअल हीरो या चित्रपटामध्ये स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली. तसेच नांदेड येथील कलावंत कुणाल गजभारे यांनी मुख्य नक्षलवाद्याची भूमिका पार पाडली. तर नक्षलवादी होता होता परदेशात जाऊन एम.एस. झालेला पुरू पुंगाटीच्या भूमिकेत राहुल गायकवाड, कॅमेरा सहाय्यक महिंद्र गजभारे, पोस्ट प्रोडक्शनसाठी सचिन केरूलकर आणि हेमंत वाघ याने एका आदीवासीची भूमिका पार पाडली.
कलावंत कुणाल गजभारे यांनी सदरील चित्रपटात अभियानयासह सहाय्यक आणि कास्टिंग डायरेक्टरची महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. ज्यांचा सिनेसृष्टी अथवा चित्रपटाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. चित्रपट म्हणजे काय, कॅमेरा, शुटींग याविषयी आदिवासींना ना कुतूहल ना उत्सुकता. अशा लोकांमधून तीनशे ते साडेतीनशे जणांची निवड करणे, हे माझ्यासमोरचे मोठे आव्हानच होते. परंतु, हे आव्हान स्वीकारल्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नव्हता. कारण मुंबईत राहणे अन् दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न समोर होता.
पुरूषोत्तम बेर्डे यांनी कास्टींगमध्ये काम करण्याचे सुचविले. त्यातूनच दिग्दर्शिका अँड. समृद्धी पोरे यांनी अभिनय, दिग्दर्शनात साह्य करण्याबरोबरच कास्टिंग करण्याची जबाबदारीही माझ्यावर टाकली. तसेच डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मदाकिनी आमटे यांच्या जीवनावरील चित्रपट त्यांच्या परिसरात आणि आदिवासींना सोबत घेवून करायचा हा निश्चय अँड. पोरे यांनी केला होता. त्यामुळे आम्ही कलावंत निवडीसाठी भामरागड, हेमलकसा परिसरात असलेल्या जंगलातील १८ ते २0 गावांना भेटी दिल्या. परंतु, भाषेच्या अडसरामुळे कामाला ब्रेक बसत होता. त्यांच्यात राहून ती भाषा, त्यांची राहणी शिकून त्यांना जिंकण्याचा प्रयत्न टीमने केल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी भागात गेल्यांनतर डॉ. प्रकाश आमटे यांचे नाव सांगून फिरायचो, त्यामुळे कुठल्याच अडचणी आल्या नाहीत. हळूहळू पाहिजे तसा अभिनय करणारे मूळ आदिवासी मिळत होते. काम सुरू होते. परंतु, अनेकवेळा जो आदिवासी अँक्टिंग करून गेला तो पुन्हा मिळत नव्हता. अशावेळी त्याचा शोध घेण्यासाठी अख्खे जंगल पायाखाली घालण्याची वेळ आमच्यावर यायची. यामुळे आदिवासींशी जमलेली मैत्री खूपच आनंद देणारी असल्याचे कुणाल गजभारे यांनी सांगितले.
नांदेडच्या चार जणांना चित्रपटात कामाची संधी दिली. हेमलकसा येथे दीड महिना राहण्याचा योग म्हणजे माझ्या आयुष्याची खरी शिदोरी होय, असे कुणालने सांगितले. /(प्रतिनिधी)
■ अभिनयाबरोबरच कुणालमध्ये समोरच्या व्यक्तीकडून एखादे काम करून घेणे ही कला अवगत होती. त्याच्यातील सकारात्मक दृष्टिकोणामुळेच कास्टिंगसारखी जबाबदारी कुणालला दिली. त्याने प्रचंड मेहनत घेवून या चित्रपटात काम केले. सिनेसृष्टीत तो नक्की नाव करेल - अँड. समृद्धी पोरे