विष्णुपुरी जलाशयाजवळ डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:22 AM2021-08-13T04:22:36+5:302021-08-13T04:22:36+5:30

नांदेड - सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नांदेड शहरासह जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या डाॅ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ देशाचे ...

Dr. near Vishnupuri reservoir. A memorial of Shankarrao Chavan will be erected | विष्णुपुरी जलाशयाजवळ डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारणार

विष्णुपुरी जलाशयाजवळ डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारणार

googlenewsNext

नांदेड - सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नांदेड शहरासह जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या डाॅ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ देशाचे माजी गृहमंत्री डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्मारक उभारणीसाठी १३ काेटी २६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व आराखड्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे.

१४ जुलै २०१९ ते १४ जुलै २०२० दरम्यान डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष हे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले हाेते. डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकल्प, धरणे उभारणीतील याेगदान अत्यंत माेठे आणि माेलाचे राहिलेले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज जायकवाडी, विष्णुपुरी या प्रकल्पामुळे मराठवाड्याची तहान भागविली जात आहे. त्यांच्या या कार्याची पुढील पिढीला माहिती व्हावी, त्यांचे कार्य चिंरतन स्वरुपात एखाद्या स्मारकाच्या रुपात कायम ठेवावे या हेतूने डाॅ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गाेदावरी पाटबंधारे महामंडळाच्या १० जुलै २०२० राेजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत स्मारक उभारणीविषयी चर्चा झाली हाेती.. त्याअनुषंगाने वास्तूविशारदाकडून स्मारकाचा आराखडा व अंदाजपत्रक मागविले हाेते. त्यानंतर राज्य शासनाने ९ मार्च २०२१ राेजी या स्मारकासाठी महामंडळाच्या स्वनिधीतून खर्च करणे प्रस्तावित असल्याने नियामक मंडळाने प्रशासकीय मान्यता देणे उचित हाेईल. असे निर्देश दिले हाेते. त्यानुसार वास्तूविशारदाकडून डाॅ. शंकरराव चव्हाण स्मारकाचे आराखडा व अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले हाेते. त्याला २ जून २०२१ राेजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महामंडळाने ११ ऑगस्ट रोजी काढलेल्या या आदेशात, डाॅ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाजवळ जलसंपदा विभागाच्या अधिनस्त १.२५ हेक्टर उपलब्ध जागेत उद्यान, पर्यटन परिसर विकास व इतर अनुषंगिक कामे तसेच माजी मुख्यमंत्री स्व. डाॅ. शंकररावजी चव्हाण यांच्या स्मारक उभारणीच्या अंदाजपत्रकास १३ काेटी २६ लाखांच्या किमतीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यापैकी १२ कोटी २८ लाख कामाप्रित्यर्थ व ९८ लाख रुपये अनुषंगिक खर्च आहे. या कामावर हाेणारा खर्च हा महामंडळाच्या स्वधनिधीतून भागविण्यात यावा. नियमाक मंडळाच्या पुढील बैठकीत हा ठराव कायम करण्याची वाट न पाहता कार्यकारी संचालकांनी कार्यवाही करण्यास नियामक मंडळाची सर्वानुमते मान्यता देण्यात येत आहे, असे गाेदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता म. र. अवलगावकर यांनी प्रशासकीय मान्यता आदेशात म्हटले आहे. जलाशयाजवळ उभारण्यात येणाऱ्या डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मारकामुळे नांदेड शहराच्या वैभवात आणखी भर पडणार असून शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठीही हे आकर्षण ठरणार आहे.

Web Title: Dr. near Vishnupuri reservoir. A memorial of Shankarrao Chavan will be erected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.