नांदेडमध्ये आजपासून आॅटोचालकांसाठी ड्रेस कोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:31 PM2018-07-06T18:31:12+5:302018-07-06T18:32:56+5:30

शहरातील आॅटोचालकांना आजपासून ड्रेसकोड वापरणे बंधनकारकर करण्यात आले. जे आॅटोचालक ड्रेसकोड वापरणार नाहीत, अशांचे आॅटो परवाने निलंबित केले जातील

Dress code for auto drivers from today in Nanded | नांदेडमध्ये आजपासून आॅटोचालकांसाठी ड्रेस कोड  

नांदेडमध्ये आजपासून आॅटोचालकांसाठी ड्रेस कोड  

googlenewsNext

नांदेड : शहरातील आॅटोचालकांना आजपासून ड्रेसकोड वापरणे बंधनकारकर करण्यात आले. जे आॅटोचालक ड्रेसकोड वापरणार नाहीत, अशांचे आॅटो परवाने निलंबित केले जातील, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली.

आॅटो संघटनांच्या विनंतीवरुन ड्रेसकोडसाठी ५ जुलै ही तारीेख देण्यात आली होती. ती आता संपली. शुक्रवारपासून ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आले. आॅटोचालकांना खाकी शर्ट आणि मालकांना पांढरा शर्ट घालणे आवश्यक आहे.  शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावून आॅटोची तपासणी करण्यात येईल. जे चालक ड्रेसकोड वापरणार नाहीत, अशांच्या आॅटोचे परवाना निलंबित करण्यात येतील. शिवाय आॅटो ताब्यातही घेतला जाईल. परवान्याचे उल्लंघन केल्यास १२० दिवसापर्यंत परवाना निलंबित होऊ शकतो, अशी माहितीही चंद्रशेखर कदम यांनी दिली. 

‘फॅन्सी’ नंबर तपासणीची मोहीम चालूच राहणार आहे. नागरिकांनी फॅन्सी नंबरची माहिती द्यावी, अशा लकाविरुद्ध कारवाई केली जाईल. माहिती देण्याऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही कदम म्हणाले. याशिवाय फट्फट् आवाज करणाऱ्या बुलेटचाही तपास करणे सुरु आहे. अशा काही बुलेट चालकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. बुलेट चालकांनी मूळ कंपनीचे सायलेंसर बसवून घ्यावे, एकदा गाडी पकडल्यानंतर सदरची बुलेट कंपनीचे मूळ स्वरुपात आणल्याचे प्रमाणपत्र परिवहन अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच बुलेट सोडून दिली जाईल, अशी माहितीची चंद्रशेखर कदम यांनी दिली. 

Web Title: Dress code for auto drivers from today in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.