‘नीट’ मध्ये ड्रेसकोडची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:45 AM2019-05-06T00:45:03+5:302019-05-06T00:46:36+5:30

नांदेड जिल्ह्यातील ४८ परीक्षा केंद्रांवर रविवारी जवळपास १८ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा दिली. परंतु गतवर्षीच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेतील अनेक परीक्षा केंद्रांवर नियम विसरत परीक्षा पार पडली. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

dress code violation in 'neet' exam | ‘नीट’ मध्ये ड्रेसकोडची पायमल्ली

‘नीट’ मध्ये ड्रेसकोडची पायमल्ली

Next
ठळक मुद्देभर उन्हात झाली परीक्षा : ऐन वेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ४८ परीक्षा केंद्रांवर रविवारी जवळपास १८ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा दिली. परंतु गतवर्षीच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेतील अनेक परीक्षा केंद्रांवर नियम विसरत परीक्षा पार पडली. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करुन ‘नीट’ अर्थात नॅशनल इलिजीबिलीटी एन्ट्रस टेस्ट) परीक्षा देतात. ही परीक्षा देताना परीक्षार्थ्यांना अनेक नियम तयार केले आहेत. गतवर्षी ही परीक्षा दिल्लीच्या ‘सीबीएसी’ने घेतली होती. यावर्षी नीटची परीक्षा घेण्याची जबाबदारी ‘एनटीए’ नॅशनल टेस्टींग एजन्सीला दिली होती. परंतु या एजन्सीने परीक्षा घेताना कुठल्याही प्रकारच्या नियमावलीचे पालन न केल्याचे दिसून आले.
ड्रेसकोडसंदर्भात ‘नीट’कडून महत्त्वाच्या सूचना परीक्षार्थ्यांना होत्या. त्यामध्ये कपडे शक्यतो फिकट रंगाचे, हाफशर्ट, कपड्यांवर मोठे बटन्स, डिझाईन असू नये. जास्तीचे पॉकीट असणारे कपडे घालण्याचे बंधन असताना अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी ड्रेसकोडचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.
रविवारी झालेल्या नीट परीक्षेत विद्यार्थी चक्क परीक्षा दालनात बूट, सॅन्डल्स, हाय हील्स सॅन्डल्स, जीन्स पॅन्ट, रंगीबेरंगी कपडे परिधान करुन आले होते.
अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना वेळ पाहण्यासाठी केंद्रातील परिसरात मोठे घड्याळ लावणे आवश्यक असताना नीट परीक्षेच्या वेळेनुसार असलेले घड्याळ दिसून आले नाही.
यावर्षी ही परीक्षा दुपारच्यावेळी घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागला. या परीक्षेत ड्रेसकोडच्या नियमाचे परीक्षार्थ्यांकडून अनेक परीक्षा केंद्रावर उल्लंघन झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात परीक्षा घेणारी एनटीए या एजन्सीला फारसे गांभीर्य नसल्याचे आढळले़
ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्यामुळे बाहेरगावहून आलेल्या विद्यार्थी व पालकांची केंद्र शोधण्यासाठी तारांबळ उडाली. एनटीएने विद्यार्थ्यांची ड्रेसकोड संदर्भात असलेली नियमावली तपासली नसल्याचे दिसून आले. देशपातळीवर झालेल्या व कठोर नियम असलेल्या यावर्षीच्या परीक्षेत जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसले़
आयपी अ‍ॅड्रेस बदलल्याने उडाला गोंधळ
इंटरनेट कॅफे, आॅनलाईन चेक केल्यानंतर आयपी अ‍ॅड्रेस बदल्याचे दिसून आले़ त्यानंतर बहुतांश पालकांनी हॉलतिकीटच्या दुसºया प्रिंट काढून घेतल्या़ परंतु, अचानक केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले़
नीट परीक्षेच्या हॉलतिकीटवर आॅनलाईन कामकाजासाठी दिलेले आयपी अ‍ॅड्रेस बदलल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला़ सदर आयपी अ‍ॅड्रेस हा केवळ आॅनलाईन कामकाजासाठी असतो़ परंतु, त्यासंदर्भातील मॅसेज काही विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच शनिवारी आल्याने अनेक विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळ उडाला़
एनटीएच्या कारभारावर पालकांची नाराजी
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेडसारख्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले़ गतवर्षी सीबीएससी बोर्डाने परीक्षेचे योग्य नियोजन केले होते़ परंतु, यंदा सदर काम एनटीए या खासगी संस्थेला परीक्षेचे काम दिल्याने बºयाच प्रमाणात गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान, बहुतांश विद्यार्थ्यांना ग्रामीण भागासह परजिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले़ नायगाव, लोहा, कंधारसारख्या तालुका पातळीवर केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली़ तर काही विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यात पुणे, औरंगाबाद येथे केंद्र दिल्याने त्यांना परीक्षेच्या दोन दिवस अगोदरच मुक्कामी जावे लागले़
‘छावा’कडून थंड पाण्याची व्यवस्था
छावाकडून नीटची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ यशवंत कॉलेज परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थ्यांसाठी त्यांच्यासोबत पाण्याची बॉटल देण्यात आली़ तर पालकांसाठी बाहेर थंड पाण्याचे जार ठेवण्यात आले होते़
यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे दशरथ कपाटे, मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्तार पठाण, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज उबाळे, सन उल्ला शेख, सलीम, सचिन कंकाळ, सचिन पाटील, नरेश पाचरणी, दीपक तोडमे आदींची उपस्थिती होती़
दिलेले पेनही चालेनात
नीट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए)कडून काळ्या रंगाच्या बॉलपेन देण्यात आल्या. परंतु त्या पेनचा दर्जा चांगला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडवताना पेन चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाया गेला.
अनेक परीक्षा केंद्रावर खोल्यामध्ये पंख्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घामाघूम होत पेपर सोडवावा लागला़
हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचे पत्ते हे अर्धवट होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची चांगलीच पंचाईत झाली़ परीक्षा केंद्र शोधण्यासाठी त्यांना घाम गाळावा लागला़

Web Title: dress code violation in 'neet' exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.