रेल्वेच्या समस्यासंदर्भात ‘डीआरएम’ची भेट घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:00 AM2018-11-07T01:00:00+5:302018-11-07T01:01:00+5:30
येथील रेल्वेस्थानक परिसर आणि तालुक्यातील रेल्वेस्टेशनवर शौचालय, लघूशंकागृह, रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे अंडरब्रिजच्या कामासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन चर्चा करू, असे मत हिंगोली लोकसभेचे खा. राजीव सातव यांनी व्यक्त केले.
हिमायतनगर : येथील रेल्वेस्थानक परिसर आणि तालुक्यातील रेल्वेस्टेशनवर शौचालय, लघूशंकागृह, रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे अंडरब्रिजच्या कामासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन चर्चा करू, असे मत हिंगोली लोकसभेचे खा. राजीव सातव यांनी व्यक्त केले.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते चर्चा करीत होते. यावेळी प्रथम त्यांनी शहराचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे संचालक अनिल मादसवार यांच्या हस्ते सातव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराच्या संदर्भात त्यांनी माहिती घेतली़ तसेच पुरातन कालीन मंदिरासंदर्भात काही राजपत्रित कागदपत्रे यासह इतर पुरावे असतील तर मंदिरासाठी काहीतरी करता येईल असे सांगितले.
यावेळी हिमायतनगर येथील पत्रकार संघटनेच्या वतीने रेल्वेच्या संदर्भातील समस्या व पार्डी येथील रस्त्याचे काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे केले जात असल्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत अनेकांनी मत मांडले. यावेळी खा़सातव यांनी रेल्वेच्या संदर्भाने सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रत्नशील आहे. याबाबत लवकरच मी नांदेड डिव्हिजन रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन या संदर्भात प्रश्न मार्गी लावू आणि तुमच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ उपस्थित राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर चाभरेकर, जब्बार, माजी जि़प.सदस्य समद खान, साईनाथ कोमावार, ज्ञानेश्वर शिंदे, सय्यद निसार उपस्थित होते.