नांदेडमध्ये एनसीबीकडून ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; अन्य राज्यांतही छापेमारी; १११ किलो पॉपी स्ट्रॉचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:42 PM2021-11-24T12:42:55+5:302021-11-24T12:44:25+5:30
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, येथे ड्रग्ज बनविल्यानंतर ते अनेक राज्यांना पुरविले जातात.
मुंबई : नांदेडमधून जप्त केलेल्या ११२७ किलो गांजापाठोपाठ एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आड सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे.
यामध्ये हेरॉईन बनविण्यासाठी लागणारे १११ किलो पॉपी स्ट्रॉ (खसखसचा पेंढा), नोट मोजण्याचे मशीन तसेच अफू जप्त करण्यात आले आहे.
इतर राज्यांतून आणला माल -
मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यांतून अवैध पद्धतीने हे पॉपी स्ट्रॉ नांदेडमध्ये आणण्यात आले होते. हे पॉपी स्ट्रॉ ताजे असताना यातून बाहेर येणाऱ्या पदार्थातून अफू बनवले जाते. तर हे पॉपी स्ट्रॉ सुकल्यानंतर त्याचा वापर हेराॅईन बनविण्यासाठी केला जातो. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, येथे ड्रग्ज बनविल्यानंतर ते अनेक राज्यांना पुरविले जातात.