हमाल मापडांच्या आंदोलनामुळे भोकरची बाजारपेठ ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:31 AM2018-01-25T00:31:58+5:302018-01-25T00:32:20+5:30
येथील बाजार समिती अंतर्गत काम करणाºया हमाल- मापाडी मजुरांनी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प पडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : येथील बाजार समिती अंतर्गत काम करणाºया हमाल- मापाडी मजुरांनी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प पडली होती.
बाजार समितीच्या मोंढा येथील २५० हमाल- मापाडी काम करतात. या कामगारांना देण्यात येणारे मजुरीचे दर सन २००८ पासून वाढविण्यात आले नाहीत. यामुळे अल्पदरात काम करावे लागत असल्याने वेळोवेळी दर वाढवून देण्याची मागणी करुनही दरवाढ होत नव्हती. अखेर कामबंद आंदोलन करुन मजूरदारांनी मोंढा मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, २७ रोजी बाजार समितीत संबंधितांची बैठक घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र बाजार समितीचे सचिव यांनी दिल्याने दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनास उपसभापती गणेश राठोड, संचालक जाकेरखाँ पठाण, सतीश देशमुख, सुनील चव्हाण, आप्पाराव राठोड, देवानंद धूत यांनी भेट दिली.
आंदोलनात भोकर हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष सुरेश करंडेकर, उपाध्यक्ष उत्तम जाधव, सचिव अनिल जाधव, महाराष्ट्र जनकल्याण कामगार महासंघाचे अध्यक्ष रामधन राठोड, दत्तात्रय वानखेडे, संतोष जाधव, नरसिंग डोईफोडे, विठ्ठल माचनवाड, बाबूराव नामेवाड, महानंदा कांबळे, गंगाबाई घुले आदी सहभागी झाले होते.
महिला मजुरांची व्यापाºयांकडून पिळवणूक
बाजार याडार्तील व्यापाºयांकडून महिला मजुरांची पिळवणूक होत असल्याची तक्रार महिला मजुरांनी केली. त्या म्हणाल्या की, येथील व्यापारी हमाल-मापाडी महिला मजुरांना कामाचा मोबदला न देता आपल्या प्रतिष्ठानातील व घरगुती कामे मोबदला न देता करुन घेतात. रात्री उशिरापर्यंत मुकाट्याने काम करावे लागते़ तसेच त्याच्याकडे आलेल्या शेतीमालाची राखण करण्याची जबाबदारी महिलांवर सोपवित असल्याने रात्रीला पहारा देण्याचे काम करावे लागते.