किनवट तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:40 AM2018-12-07T00:40:01+5:302018-12-07T00:44:04+5:30

पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़

Due to drought in the kinwat taluka | किनवट तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

किनवट तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

Next
ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरनद्या, तलाव आटले, हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसण्याची वेळ

गोकुळ भवरे।

किनवट : तालुक्यात मागील पावसाळ्यात झालेल्या धरसोड व अल्प पर्जन्यमानामुळे छोटे, मोठे नाले कोरडेठाक पडू लागले आहेत़ पैनगंगा नदीचीही धार कमी होत चालली आहे़ माळरानावरील भागातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून येत्या काळात १ लाख ५९८४ जनावरांच्या चा-याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे़
किनवट तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे असून तालुक्यात गायवर्ग ७००३६ , म्हैस वर्ग ७ हजार २२ , शेळ्या २५ हजार ९३१ , मेंढ्या २हजार ९९५ असे एकूण १ लाख ५ हजार ९८४ पशुधन आहे़ चांगला पाऊस झाला तर जंगलात चारा व पाण्याची समस्या निर्माण होत नाही़ मात्र अलीकडच्या काळात पर्जन्यमान घटत चालल्याने भूगभार्तील पाणी पातळी खोल जाऊन पाणी टंचाईची समस्या उदभवते़ गतवर्षी पन्नास टक्केच्या आत पावसाळा झाला़ यावर्षी ६६ टक्के इतकी नोंद असली तरी धरसोड पध्दतीने पाऊस झाला़ ११८ दिवसाच्या पावसाळ्यात ६९ वेळा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे़ त्यातही २० वेळा दोन अंकी तर ४९ वेळा एक अंकी पाऊस पडला आहे़ पावसाचा खंड यामुळे नदीनाल्याना मोठा पूर आला असला तरी जमिनीत पाणी मुरलेच नाही़
पावसाचा खंड पडला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला़ पन्नास टक्केच्या आतच उतारा आल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ कमी पावसाचा फटका जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्यावर बसणार आहे़ हे संकट ओढवल्याने व बहुतांश गावांना टंचाईच्या झळा बसणार असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून टंचाई पूर्व उपाय योजना आतापासूनच राबवून नागरिक व पशुपालक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़
किनवट तालुक्यावर ओढवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वेळीच पावले उचलत भविष्यात निर्माण होणाºया संकटाचा सामान करण्यासाठी सज्ज राहा, आतापासूनच तयारीला लागा, अशा सूचना आ़ प्रदीप नाईक यांनी संबंधितांना दिल्या आहेत़ संभाव्य परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असल्याचे ही आ़ प्रदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़

Web Title: Due to drought in the kinwat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.