फाळणीमुळे नव्हे तर द्वेषभावनेमुळेच गांधी हत्या - तुषार गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:09 AM2018-01-23T00:09:36+5:302018-01-23T11:22:11+5:30
मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़
नांदेड : मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि फाळणीला मान्यता दिल्यामुळेच गांधींची हत्या झाल्याचे सांगितले जाते़ मात्र फाळणी हे हत्येचे खरे कारण नाही़ तर धर्मवादी शक्तींनी त्यांचा दीर्घकाळ केलेला द्वेष हेच खरे कारण असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ अभ्यासक तुषार गांधी यांनी सांगितले़ ठोस पुरावा नसला तरी, गांधी हत्येच्या कटात सावरकरांचाही अप्रत्यक्ष सहभाग होता, असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला़
येथील कुसुम सभागृहात साहित्य संमेलन व्याख्यानमालेत गांधी हत्येचे कारस्थानी आणि सावरकर या विषयावर ते बोलत होते़ यावेळी प्रा़ शेषराव मोरे, माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे, उदय निंबाळकर, माजी मंत्री माधव किन्हाळकर, डॉ़वृषाली किन्हाळकर, प्रा़श्यामल पत्की, दीपनाथ पत्की, माजी आग़ंगाधरराव पटणे, प्रा़दत्ता भगत, डॉ़प्रभाकर देव, प्रा़लक्ष्मीकांत तांबोळी, प्राचार्य देवदत्त आणि प्रा़शारदा तुंगार आदी उपस्थित होते़
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे प्रत्यक्षरीत्या सामील होते़ हे दोघे त्यांना हत्यार पुरविणारे ग्वाल्हेरचे डॉ़परचुरे तसेच कटातील साथीदार विष्णू करकरे आणि दिगंबर बडगे हे सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुरुस्थानी मानत़ त्यांच्या आज्ञेशिवाय ते कोणतेच कृत्य करीत नसत़ त्यामुळे गांधी हत्या खटल्यातून सावरकरांची ठोस पुराव्याअभावी सुटका झाली असली तरी, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या कटात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता़, असे तुषार गांधी यावेळी म्हणाले़ गांधीजींची हत्या ही भारताची सत्ता ताब्यात घेण्यासाठी धर्मवादी शक्तींनी रचलेल्या व्यापक कटाचे प्राथमिक पाऊल होते, असा दावाही त्यांनी केला़ सूत्रसंचालन डॉ़बालाजी चिरडे तर डॉ़विजय भोसले यांनी आभार मानले़