वाळूचे भाव वाढल्याने बांधकामे पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:20 AM2019-03-08T00:20:58+5:302019-03-08T00:21:13+5:30
परिसरात वाळू निविदा निघाली नसल्यामुळे वाळूच्या किमती भरमसाठ वाढल्याच्या कारणावरून सध्या या परिसरात घरांची बांधकामे पूर्णत: बंद झाली असून गवंडी मिस्तरी व कामगार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ यातच पाणीटंचाई सुद्धा याला कारणीभूत होत आहे़
मुक्रमाबाद : परिसरात वाळू निविदा निघाली नसल्यामुळे वाळूच्या किमती भरमसाठ वाढल्याच्या कारणावरून सध्या या परिसरात घरांची बांधकामे पूर्णत: बंद झाली असून गवंडी मिस्तरी व कामगार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ यातच पाणीटंचाई सुद्धा याला कारणीभूत होत आहे़
मुक्रमाबाद येथील बाजारपेठेचा संबंध ५० खेडेगावाशी येतो़ येथे सिमेंट विक्री व बांधकाम मटेरियल याची सहा ते सात दुकाने आहेत़ या परिसरातील घराच्या बांधकामासाठी बिलोली तालुक्यातील येसगी येथील लाल वाळूचा व लेंडी व तेरु नदीतील काळ्या वाळूचा वापर करण्यात येतो़ पण या दोन्ही ठिकाणावरील वाळूची निविदा न निघाल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ येसगी येथील लाल वाळूचा भाव सध्या ८ हजार रुपये ब्रासच्यावर पोहोचला आहे तर लेंडी नदीतील काळ्या वाळूचा भाव पाच हजार रुपये ब्रास झाला आहे़ यातच पाणीटंचाई असल्यामुळे नवीन घर बांधणार यांनी बांधकामाला स्थगिती दिली आहे़ यामुळे कामगार वर्ग मिस्तरी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ तर लाखाच्या वर वार्षिक भाडे देऊन बांधकाम मटेरियलच्या व्यवसायिकाची मात्र गिराईक नसल्यामुळे दुकाने पडत आहेत़