लॉकडाऊनमुळे गृहिणींनी घरातच उघडले पाककलेचे दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:36 PM2020-05-06T14:36:18+5:302020-05-06T14:37:55+5:30

घरातील प्रत्येकाला चविष्ट पदार्थांसह वाचनसंस्कृती, प्राणायमाचे धडे

Due to the lockdown, the housewives opened a cooking hall at home | लॉकडाऊनमुळे गृहिणींनी घरातच उघडले पाककलेचे दालन

लॉकडाऊनमुळे गृहिणींनी घरातच उघडले पाककलेचे दालन

Next
ठळक मुद्देघरगुती चविष्ट पदार्थांमुळे खवय्यांची चंगळ 

- श्रीनिवास भोसले
नांदेड : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, चायनिज सेंटर, पाणीपुरी बंद असल्याने आपल्या घरातील खवय्यांची इच्छा पूर्ण करण्याची संधी गृहिणींना मिळाली आहे़ त्यातूनच मध्यमवर्गीय घरातील गृहिणींच्या पाककलेला चालना मिळत आहे़ रोज नवनवीन पदार्थ बनवणे व त्याचे फोटो स्टेट्सला, सोशल मीडियावर अपलोड करण्याची जणू गृहिणींमध्ये स्पर्धाच लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे़

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे़ परंतु, घरात बसून पुरूष मंडळी टिव्ही पाहणे, पुस्तक वाचणे आणि फारच कंटाळा आलाच तर बाहेर फेरफटका मारत आहेत़ या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ गृहिणी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी इंटरनेटचा आणि सोशल मिडियाचा वापर करीत आहेत़ घरातील वा आप्तेष्ट, मित्र, मैत्रिण यांचा वाढदिवस असला की हॉटेलिंग अथवा पाणीपुरी, भेळ, चायनिज पदार्थांची पार्टी ठरलेली असायची़ परंतु, लॉकडाऊनमुळे या सर्वांवर गदा आली आहे़ परंतु, अनेक घरामध्ये मुली-गृहिणींनी घरातच केक बनवून वाढदिवस, अ?ॅनिव्हर्सरी साजरी केल्याचे पहायला मिळत आहे़

लॉकडाऊमुळे घरातील मंडळींना आणि गृहिणींना वेळच वेळ मिळत आहे़ त्याचा सदुपयोग करता यावा म्हणून वाचन, विविध पदार्थ पाहणे, प्राणायम आदी उपक्रम हाती घेत आहेत़ यातूनच वेगवेगवेगळे पारंपरिक पदार्थ घरीच बनविण्याबरोबर बेकरी, हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या प्रत्येक पदाथार्ची रेसिपी युट्युबवर पाहून घरी बनविण्यात अनेक गृहिणी गुंतलेल्या आहेत़ विविध प्रकारचे केक, चाईनिज पदार्थ, रेसिपीज, साऊथ आणि पंजाबी डिशेस बनविण्याचे काम महिला करीत आहेत़ त्यांनी बनविलेल्या पदार्थांचा घरातील लहापासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण अस्वा घेत आहे़  

अभ्यासक्राबरोबरच दिले जाताहेत इतिहासाचे धडे
प्रत्येक जण आज आपल्या कुटुंबियासमवेत आहे़ दिवसभर वेळेच वेळ असल्याने करमणुकीबरोबरच मुलांच्या अभ्यासाकडे बहुतांश पालक लक्ष देत आहेत़ त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यावर भर दिला जात आहे़ करमणुकीसाठी विविध खेळ, वाचन नित्यनियमच झाला आहे़ बऱ्याच घरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ़बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरूषांच्या जीवनकायार्चे धडे दिले जात आहेत़

लॉकडाऊनमध्ये २४ डिश बनविल्या
घरातील प्रत्येकाची आवड वेगळी, मग नेहमीच्या जेवनासह नवीन एक पदार्थ बनविण्याचा प्रयत्न केला़ यातून आज २४ विविध डिश बनविल्या़ यात बेकरी, चायनिज, साऊथ आणि अधिक प्रमाणात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश आहे़ आवडीच्या पदार्थांबरोबर दररोज मुलींचा अभ्यास, नियमित व्यायाम आणि दररोज किमान १५ भाग स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे पाहिले़ यातून आजपर्यंत ७२० भाग पाहणे झाले़ 
- सुनीता मिरटकर,  शारदानगर

नवीन भाषा अवगत करण्याचा प्रयत्न
घरातील सर्वच कामे करून मिळालेल्या वेळेत सोशल मिडिया अथवा इंटरनेटवरील रेसिपी पाहून मी जवळपास १२ नवीन पदार्थ बनवायला शिकले़ तसेच आमचे मुळ गाव देगलूर तालुक्यात असल्याने तेलगू भाषेचा थोडा गोडवा होता़  त्यामुळे तेलगू चित्रपट पाहणे, नवीन शब्द पाठ करून नवीन भाषा अवगत करण्याचा प्रयत्न केला़ 
- सुमती बासरे, गृहिणी

Web Title: Due to the lockdown, the housewives opened a cooking hall at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.