पुनर्भरणामुळे बोअरचे पाणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:39 AM2019-05-17T00:39:37+5:302019-05-17T00:41:05+5:30

दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़

Due to rehabilitation, the water of the bore continues | पुनर्भरणामुळे बोअरचे पाणी कायम

पुनर्भरणामुळे बोअरचे पाणी कायम

googlenewsNext
ठळक मुद्देबारूळ ग्रा़पं़चा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच बारूळ येथील प्रा़आक़ेंद्रात यशस्वी प्रयोग

बारूळ : दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़
बारूळ व परिसरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे़ मे महिन्यात बारूळ व परिसरातील अनेक बोअरचे पाणी आटल्या जाते किंवा अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत होते़ धरण उशाला असूनही अनेक बोअर व विहिरीच्या घशाला कोरड पडली आहे़
पण जलसंधारण विभागातीलच असलेला हा उपक्रम पंचायत समिती बैठकीत गटविकास अधिकारी यांनी छतावरील पाण्यातून पुनर्भरण उपक्रम बारूळ येथे राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या़ हा उपक्रम चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आला़ यासाठी ग्रामपंचायत छतावरील सर्व पाणी छतावर एकत्रित करून ते सर्व पाणी पीव्हीसी पाईप लाईनद्वारे बोअरमध्ये सोडण्यात आले़ त्यामुळे या उन्हाळ्यात येथील रुग्णाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही़ हा उपक्रम प्रत्येक बोअरजवळील छतावरील पाण्याचे नियोजन करून या पाण्याचे योग्य विल्हेवाट सोय ग्रा़पं़ कार्यालयाच्या वतीने चालू आहे़ या उपक्रमामुळे प्रत्येक बोअर उन्हाळ्यात पाणी राहण्यासाठी मदत होते़ हा प्रयोग उपक्रम जिल्ह्यात प्रथमच बारूळ येथे करण्यात आला आहे़परिसरात हा उपक्रम राबविल्यास पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़

बारूळ प्रा़आ़ केंद्रात दररोज १०० ते १५० बाह्य व आंतररुग्ण ओपीडी होते़ या रुग्णांचे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ पण ग्रा़पं़ कार्यालयाच्या पुढाकारातून येथील बंद पडलेले बोअर चालू झाले़ त्याचे कारण छतावरील पाण्याचे बोअरमध्ये सोडून पुनर्भरणा केल्याने पाणीपातळी वाढली आहे
-डॉ़आरक़े़ मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, बारूऴ
रुग्णांच्या व येथील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्रयोग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यातून बोअरमध्ये पाईपलाईनद्वारे सोडून बोअरचे पुनर्भरण करण्यात आला़ हा उपक्रम साध्य झाल्याने येथील पाण्याच्या समस्या सुटल्या असून इतरांनाही पुनर्भरण केल्यास पाणीटंचाईचे संकट दूर होईल़
-शंकरराव नाईक, सरपंच, बारूऴ
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतावरील पाण्यातुन पुनर्भरण करणे हा जिल्ह्यातील प्रथम उपक्रम बारूळ येथे करण्यात आला़ या उपक्रमामुळे पाण्याची बचत, टंचाईवर मात करून समस्या सोडवून या ग्रामपंचायतीने उपक्रमातून वेगळा आदर्श तयार केला आहे़ -डॉ़व्ही़जी़ आदमपूरकर, ग्रामविकास अधिकारी, बारूऴ

Web Title: Due to rehabilitation, the water of the bore continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.