बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदेड जिल्ह्यात दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:43 AM2018-05-31T00:43:52+5:302018-05-31T00:43:52+5:30

बँक कर्मचा-यांना १ नोव्हेंबर २०१७ पासून पुरेशी वेतनवाढ लागू करण्यात यावी, वेतनवाढीचा करार सर्व श्रेणीतील अधिका-यांना लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या वतीने संप सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

Due to the strike of bank employees, Rs. 2 thousand crores of rupees were stalled in Nanded district | बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदेड जिल्ह्यात दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदेड जिल्ह्यात दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प

Next
ठळक मुद्देबँक व्यवस्थापन : सरकारच्या धोरणांचा विरोध ; आर्थिक व्यवहार थंडावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बँक कर्मचा-यांना १ नोव्हेंबर २०१७ पासून पुरेशी वेतनवाढ लागू करण्यात यावी, वेतनवाढीचा करार सर्व श्रेणीतील अधिका-यांना लागू करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या वतीने संप सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
बँक व्यवस्थापनाने २ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचा-यांसमोर ठेवला आहे. त्या प्रस्तावास युनियनचा विरोध आहे. त्यामुळे बँक कर्मचा-यांच्या नऊ युनियन्सच्या युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियनने संपाची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने नांदेडच्या शिवाजीनगर येथील एसबीएच बँकेच्या मुख्य शाखेसमोर कर्मचा-यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. नांदेड शहरातील राष्टÑीयीकृत बँकेच्या एकूण २० शाखा आहेत. कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले असल्याची माहिती युनियनच्या पदाधिकाºयांनी दिली. दरम्यान, बँकेसमोर करण्यात आलेल्या निदर्शनात ३०० ते ३५० अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. यावेळी बँक व्यवस्थापन व सरकारच्या धोरणांविरूद्ध निदर्शने करण्यात आली.
---
आजही संप सुरूच राहणार ; बँकिंग व्यवहार विस्कळीत
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, ३१ मे रोजी दुस-या दिवशीही देखील संप सुरूच राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी जसबिरसिंग टुटेजा, विजयालक्ष्मी अय्यर, किरण जिंतूरकर, एस.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवाजीनगर येथील बँकेसमोर कर्मचा-यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यशस्वीतेसाठी सुरेंद्र पवार, कौशल किशोर, सेनगावकर, चंदू सूर्यवंशी, मिलिंद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

---
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका जरी बंद असल्या तरी स्थानिक बँकांचे कामकाज सुरू होते़ परंतु, राष्ट्रीयीकृत बँका बंद असल्याचा परिणाम सर्वच आर्थिक व्यवहारांवर जाणवला.बँकांतील आरटीजीएस, ट्रान्सफर, चेक क्लेरसन्स या सारख्या सेवा बँक कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाल्या होत्या़ दरम्यान, शहरातील अनेक भागांतील एसटीएममध्ये सायंकाळी खडखडाट झाल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र बघावयास मिळाले.

Web Title: Due to the strike of bank employees, Rs. 2 thousand crores of rupees were stalled in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.