डमी परिक्षार्थी प्रकरणात मंत्रालयातील लिपीकासह जि.प.चा अभियंता एसआयटीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:06 PM2018-05-08T15:06:39+5:302018-05-08T15:06:39+5:30

राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने सोमवारी आठ जणांना अटक केली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या

In the Dummy test case, ZP engineer and clerk from mantralaya arrested by SIT | डमी परिक्षार्थी प्रकरणात मंत्रालयातील लिपीकासह जि.प.चा अभियंता एसआयटीच्या जाळ्यात

डमी परिक्षार्थी प्रकरणात मंत्रालयातील लिपीकासह जि.प.चा अभियंता एसआयटीच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्दे या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या ३६ वर पोहोंचली आहे़ अटक करण्यात आलेल्या ३६ जणांपैकी ४ जणांना जामीन मिळाला आहे़ 

नांदेड : राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने सोमवारी आठ जणांना अटक केली होती़ त्यानंतर मंगळवारी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून या प्रकरणात आता अटक केलेल्या आरोपींची संख्या ३६ वर पोहोंचली आहे़  
एमपीएससी डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ३६ जणांपैकी ४ जणांना जामीन मिळाला आहे़ 

सोमवारी एसआयटीने आठ जणांना अटक केली होती़ त्यात लक्ष्मण शंकर चव्हाण, धनराज नरसिंग राठोड, अनिल रावसिंग जाधव, स्वप्निल शिवाजी पवार, सुनील बन्सी राठोड, कुणाल विनोद राठोड, चंदन केवलसिंघ राठोड, शिवप्रसाद विजय डुमणे यांचा समावेश होता या आरोपींमध्ये तलाठी, लिपीक, कालवा निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षक  या पदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश होता़ या सर्वांना सोमवारी रात्री १० वाजता किनवट न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांना न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली़ 
त्यानंतर मंगळवारी या प्रकरणात नांदेड जिल्हा परिषदेत सहा़अभियंता असलेले विशाल रंगराव पवार व मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ लिपीक बाळासाहेब व्यंकट भातलोंढे या दोघांना अटक करण्यात आली आहे़ आतापर्यंत या प्रकरणात एकुण ३६ आरोपींना अटक केली आहे़ 

Web Title: In the Dummy test case, ZP engineer and clerk from mantralaya arrested by SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.