नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:33 AM2018-07-14T00:33:58+5:302018-07-14T00:34:20+5:30

आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

Dump 'Server' to fill up the Peugeot in Nanded | नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

Next
ठळक मुद्देगतवर्षी साडेदहा लाख शेतकऱ्यांचा समावेश

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप-२०१८ मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे़ सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आदी खरीप पिकांचा या योजनेत समावेश केला आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे़ परंतु, त्या तुलनेत शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़
बँकेत पीकविमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै तर बिगरकर्जदार शेतकºयांना पीकविमा उतरवण्याची २४ जुलै अंतिम तारीख देण्यात आली आहे़
मागील वर्षी १० लाखांहून अधिक शेतकºयांनी पीकविमा भरला होता़ त्यापैकी ७ लाख ४३ हजार ५९५ शेतकºयांना ५४२ कोटी ७५ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे़ ऐन पेरणीच्या काळात पीकविमा मिळाल्याने बहुतांश शेतकºयांची पेरणी आनंदात झाली़
यंदा पीकविमा भरण्यास अडचणी येत आहेत़ जिल्ह्यातील ३०२ सेतू सुविधा केंद्रांपैकी जवळपास शंभरांवर केंद्र बंद आहेत़ तांत्रिक अडचणींमुळे सातबारा मिळत नसल्याने महा-बुलेट वेबसाईटवरून सातबारा काढून त्यावर सही, शिक्का देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी तलाठ्यांना दिल्या होत्या़ त्यातच पीकविमा भरण्याचे सर्व्हर डाऊन झाल्याने अडथळ्यात भर पडली आहे़ तर काही वेळा पीकविमा भरल्यानंतर येणारी पावती कोरी येत आहे़ त्यामुळे पुन्हा पुन्हा माहिती भरून ती पाठवावी लागत आहे़
नांदेड जिल्ह्यात यंदा पीकविमा योजना इफ्को टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत असून जवळपास ८० हजार शेतकºयांनी सोयाबीन, कापूस, उडीद आदी पिकांचा विमा काढला असून त्यापोटी साडेतीन कोटी रूपयांचा भरणा झाला आहे़
मागील वर्षात १० लाख ४० हजार ६१७ शेतकºयांनी साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचा विमा काढला होता़ यंदा सोयाबीनचे पेरणी क्षेत्र जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे़
---
कृषी विभागाने केले आवाहन
शेतकºयांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत आॅनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी शेवटच्या दिवशी गर्दी करु नये़
त्यामुळे शेतकºयांनी पीक पेºयाचे स्वयंघोषणापत्र, सातबारा, ७-अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे यांनी केले आहे़
---
अडचणी झाल्या दूर
सातबारा मिळण्यासाठी सर्व्हरची अडचण निर्माण झाली होती़ परंतु, ती दूर करण्यात आली असून शेतकºयांना वेळेत सातबारा देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत़ तसेच महा-बुलेटवरून काढण्यात येणाºया सातबारावर सही, शिक्का देण्याच्या सूचनाही तलाठ्यांना दिल्या आहेत़
-अरूण डोंगरे, जिल्हाधिकारी

Web Title: Dump 'Server' to fill up the Peugeot in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.