रानभाज्या खा अन् निरोग राहा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:52+5:302021-08-12T04:22:52+5:30
कर्टुले कर्टुल्याचे वेल असतात. ते रानातील झाडांवर वाढतात. त्याला खारकांच्या आकाराचे फळ लागतात. सदर भाज्या या आखाडतोंडीच पहायला मिळतात. ...
कर्टुले
कर्टुल्याचे वेल असतात. ते रानातील झाडांवर वाढतात. त्याला खारकांच्या आकाराचे फळ लागतात. सदर भाज्या या आखाडतोंडीच पहायला मिळतात.
घोळची भाजी...
पावसाळ्यात पिकांमध्ये तण वाढते, त्याचबरोबर काही वनस्पती गुणधर्म असलेल्या गवताचा त्यात समावेश असतो. त्यापैकी एक घोळ. घोळंची भाजी वर्षातून एकदोन वेळा खायलाच हवी.
आघाडा
आघाडा नावाची छोटे झाड असते, त्याच्या पानापासून भाजी बनविण्यात येते. निरोगी राहण्यासाठी अतिशय उत्तम असते.
पिंपळ
पिंपळ नावाची भाजी वनात मिळते. ही भाजी करण्याची विशिष्ट पद्धत असून आदिवासीबहुल भागात भाजी खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
भुई बांबूचे कोंब
भुई बांबुचे काेंब खाण्यासाठी उपयुक्त असून त्यापासून पोटाचे आजार दूर होतात. नांदेडच्या महोत्सवात सदर भाजी उपलब्ध झाली आहे.
कपाळफोडी
कपाळफोडी पूर्वी अधिक प्रमाणात उपलब्ध होत असे, परंतु मागील काही दिवसात सदर भाजी गायब झाल्याचे पहायला मिळत आहे.
तरोटा
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला सदर झाडे फुटतात. ती कोवळी असताना खुडून त्याची भाजी केली जायची. परंतु, सध्या तरोटा जास्त प्रमाणात आढळून येत नाही.
शक्तिवर्धक रानभाज्या
कोणत्याही भाज्या शरीरासाठी ऊर्जा देणाऱ्याच असतात. परंतु, रानभाज्या ह्या ठराविक दिवसात उपलब्ध होतात. त्या पिकविण्यासाठी कुठल्याही रसायनाचा वापर केलेला नसतो. त्यामुळे सदर भाज्या सर्वाधिक शक्तिवर्धक ठरत आहेत. त्याचबरोबर पित्त, मूळव्याध, त्वचारोग, पोटदुखी आदी प्रकारचे आजार काही ठराविक रानभाज्यांमुळे गायब होतात. - डॉ. शिवानंद बासरे, आहारतज्ज्ञ नांदेड.