खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले; ६० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:18 AM2021-04-01T04:18:42+5:302021-04-01T04:18:42+5:30
कोरोनामुळे उत्पन्नात घट झाली आहे. मागील वर्षभरात जवळपास ५० टक्के उत्पन्न घटले, त्यातच सर्वजण घरात राहत असल्याने किराणा सामान, ...
कोरोनामुळे उत्पन्नात घट झाली आहे. मागील वर्षभरात जवळपास ५० टक्के उत्पन्न घटले, त्यातच सर्वजण घरात राहत असल्याने किराणा सामान, तेल आदी जास्त लागत आहे. त्यातच महागाईने कळस गाठला आहे. तेल दीडशे ते दोनशे रुपये किलो झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी तेलाची फोडणी द्यावी की नाही, असा प्रश्न पडत आहे. - नंदा कदम, गृहिणी.
वर्षभरात दीडपट्टीने तेलाच्या किमती वाढणे हे पहिल्यांदाच पाहिले आहे. गृहखर्च सांभाळण्याची जबाबदारी महिलांवर असते. महिनाभरासाठी ठरवून दिलेल्या बजेटमध्ये किराणा सामान, तेल, भाजीपाला व इतर खर्च चालविण्याचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. - विजया पवार, गृहिणी
सोयाबीनच्या तेलाच्या किमती ज्याप्रमाणे वाढल्या, त्याप्रमाणे आम्हा शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव मिळत नाही की भुईमुगाला. परंतु, शेंगदाणा तेल आणि सोयाबीनचे भाव कमालीचे वाढले आहेत. या दरवाढीचा फायदा शेतकरीवर्गाला होण्यापेक्षा व्यापारी, दुकानदार आणि कंपन्यांना होतो. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचादेखील महागाईला विरोध हाेतो. - कल्पना पाटील, गृहिणी.