खाद्यतेलाचा पुन्हा उडाला भडका; भाजीपाला, फळेही महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:18 AM2021-05-11T04:18:32+5:302021-05-11T04:18:32+5:30
चौकट- किराणा बाजारात खाद्यतेलाचे दर पुन्हा तेजीकडे झुकले आहेत. सोयाबीन तेल लिटरमागे पाच रुपयांनी वाढले आहे, तर शेंगदाणा तेल ...
चौकट-
किराणा बाजारात खाद्यतेलाचे दर पुन्हा तेजीकडे झुकले आहेत. सोयाबीन तेल लिटरमागे पाच रुपयांनी वाढले आहे, तर शेंगदाणा तेल तब्बल १९० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. सूर्यफूल तेल १८५ रुपये किलो भाव आहे.
चौकट : किराणा बाजारात वेळेच्या बंधनामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिक किराणामाल खरेदीसाठी गर्दी करत आहेत. सध्या तेलवगळता सर्व वस्तूंचे भाव जैसे थे आहेत. - गजानन महाजन, व्यापारी, नांदेड
चौकट- शेतकऱ्यांवर मागील वर्षाप्रमाणेच वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची ने-आण करणे अवघड झाले आहे. अनेकदा भाजीपाल्याचे दर कोसळत असल्याने आणलेला भाजीपाला कमी किमतीत विकावा लागतो. - सोपान खुडे, तरोडा, खु.
चौकट- गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याने बजेट बिघडले आहे. सर्वसामान्यांनी जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे महागाईने माणसे होरपळून गेली आहेत. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर.