शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:36+5:302021-03-16T04:18:36+5:30

नांदेड येथे शिक्षणाधिकारीपदावर कार्यरत असताना संदीपकुमार सोनटक्के यांनी अनुदानित अथवा विनाअनुदानित अशा कोणत्याही तत्त्वावर नोकरीवर नसताना आनंद राजमाने यांची ...

Education officials are investigating | शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू

शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू

Next

नांदेड येथे शिक्षणाधिकारीपदावर कार्यरत असताना संदीपकुमार सोनटक्के यांनी अनुदानित अथवा विनाअनुदानित अशा कोणत्याही तत्त्वावर नोकरीवर नसताना आनंद राजमाने यांची २०१४ ची खोटी नेमणूक दाखवून २०१६ ला नियमित शिक्षक पदावर वेतनश्रेणीत मान्यता देऊन शासनाची दिशाभूल केली. त्याच राजमाने यांची मूळ संचिका शिक्षण कार्यालयातून गायब आहे. मात्र, शिक्षण विभागाने अद्याप पोलिसांत तक्रार दिली नाही. मूळसंचिका गहाळ असतानासुद्धा विद्यमान शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी राजमाने यांचे २०१६ पासूनचे ११ लाख २० हजार ५५६ रुपये वेतनश्रेणीत वेतन थकबाकीसह काढले. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाली. आता या प्रकरणात दिग्रसकर हे गोत्यात आले असून, त्यांच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. तक्रारदार शेख मुजीब यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासनाने जो अहवाल मागविला, हा त्या चौकशीचा एक भाग आहे.

Web Title: Education officials are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.