नांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 07:50 PM2020-09-17T19:50:26+5:302020-09-17T19:53:48+5:30

सध्या जिल्ह्यात ३ हजार ८१८ जणांवर उपचार सुरू

Eight more corona patients deaths in Nanded district; Total Corona deaths 338 | नांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८

नांदेड जिल्ह्यात आणखी आठ बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळी ३३८

Next
ठळक मुद्देगुरुवारी २६४ बाधित रुग्णांची भर ४२ बाधितांची प्रकृती गंभीर

नांदेड : मागील २४ तासात आणखी आठ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३३८ एवढी झाली आहे. तर गुरुवारी आणखी २६४ बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १२ हजार ७०१ एवढी झाली असून यातील ३ हजार ८१८ जणांवर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा कमी होत नसल्याचे गुरुवारी पुन्हा पुढे आले. मागील २४ तासात ४ पुरुष आणि ४ महिलांचा उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला. यातील पाच जणांचे मृत्यू खाजगी रुग्णालयात झाले आहेत. माहूर तालुक्यातील कारंजी येथील ६२ वर्षीय महिला नांदेड शहरातील, दत्तनगर येथील ६५ वर्षीय महिला, नांदेडमधीलच बालाजीनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, विशालनगरमधील ६५ वर्षीय पुरुष आणि चौफाळा येथील ५५ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला तर धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील २० वर्षीय महिला आणि मुदखेड येथील ५५ वर्षीय महिलेचा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला असून अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील ५० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, गुरुवारी स्वॅब तपासणीद्वारे १३७ तर अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे १२७ असे एकूण २६४ जण बाधित आढळून आले. स्वॅब तपासणीद्वारे बाधित आढळलेल्यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ९७, नांदेड ग्रामीणमधील ६, लोहा ४, हदगाव १, कंधार १, बिलोली १, हिंगोली २. लातूर २, बीड १. मुदखेड १. नायगाव ३, मुखेड ६, उमरी २, परभणी १ आणि यवतमाळ येथील एक जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे नांदेड मनपा क्षेत्रातील २४, नांदेड ग्रामीणमधील ५, हदगाव ५, अर्धापूर १८, किनवट १२, बिलोली १, मुखेड १८, हिमायतनगर १, धर्माबाद १०, उमरी २, मुदखेड ६, लोहा ४, कंधार ५, भोकर १, देगलूर १, नायगाव ५ आणि यवतमाळ येथील एकजण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

४२ बाधितांची प्रकृती गंभीर
जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ३ हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ३०८, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशन असे १५९४, जिल्हा रुग्णालय ८०, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ४०, नायगाव १३३, बिलोली ८६, मुखेड १७९, देगलूर ७५, लोहा ११४, हदगाव ५९, भोकर ३६, कंधार ५३, बारड २०, आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड ५७, अर्धापूर ३९, मुदखेड ७३, माहूर ११, किनवट २१८, धर्माबाद ५८, उमरी ८५, हिमायतनगर १६, जिल्हा मध्यवर्ती कारागृह ८२, खाजगी रुग्णालय ३९९, आणि औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद येथे संदर्भित केलल्या प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहे. यातील ४२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

Web Title: Eight more corona patients deaths in Nanded district; Total Corona deaths 338

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.