लोह्यात अध्यक्षपदासाठी आठ जण रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:58 AM2018-11-22T00:58:31+5:302018-11-22T00:59:09+5:30

लोहा नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी करण्यात आली.

Eight people in the fray for Iron Ore | लोह्यात अध्यक्षपदासाठी आठ जण रिंगणात

लोह्यात अध्यक्षपदासाठी आठ जण रिंगणात

Next
ठळक मुद्देनगरसेवकपदाचे ८२ अर्ज वैध

लोहा : लोहा नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी करण्यात आली. त्यात नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी ८२ उमेदवार वैध तर ९ उमेदवार अवैद्य ठरले.
लोहा तहसील कार्यालयात बुधवारी सकाळी निर्वाचन अधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय छाननी घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, न.प.चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची उपस्थिती होती.
लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड होणार असून त्यासाठी ८ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर ८ प्रभागात १७ जागेसाठी छाननीनंतर उमेदवार याप्रमाणे प्रभाग - १ अ:- सर्वसाधारण महिला (पाच अर्ज), प्रभाग १ ब :- नागरिकाचा मागास प्रवर्ग (सहा अर्ज), प्रभाग २ अ :- सर्वसाधारण महिला (चार अर्ज), प्रभाग क्र. २ब -अनुसूचित जाती (पाच अर्ज), प्रभाग ३ अ - अनुसूचित जाती महिला (चार अर्ज), प्रभाग ३ ब - सर्वसाधारण (सहा अर्ज), प्रभाग ४ अ -अनुसूचित जाती महिला (चार अर्ज), प्रभाग ४ ब - सर्वसाधारण (सहा अर्ज), प्रभाग ५अ - नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (चार अर्ज), ५ब :- सर्वसाधारण (पाच अर्ज), प्रभाग ६ अ - नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला (चार अर्ज), प्रभाग ६ ब - सर्वसाधारण महिला (सहा अर्ज), प्रभाग ६ क :- सर्वसाधारण (पाच अर्ज), प्रभाग ७ अ - नागरिकाचा मागासप्रवर्ग महिला (चार अर्ज), प्रभाग क्र. ७ब - (सहा अर्ज), प्रभाग क्रं. ८ अ - सर्वसाधारण महिला (तीन अर्ज), प्रभाग क्रं. ८ ब - नागरिकाचा मागासप्रवर्ग (तीन अर्ज) असे एकूण ८ प्रभागात, ८२ उमेदवारांचे सदस्य पदासाठी नामांकन वैध ठरले आहे. निवडणुकीसाठी नायब तहसीलदार अशोक मोकले, उल्हास राठोड, पी. पी. बडवणे, प्रमोद पाटील, बळी पवार, यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


यांचे अर्ज झाले बाद
गयाबाई पुरभाजी गायकवाड, (प्रभाग ३ अ अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष सुचक केवळ एक आहे), (प्रभाग ३ ब- बालाजी संभाजी रायबोले सुचक एक जोडला आहे), (प्रभाग ५ ब प्रशांत शंकर कºहाळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) जोडपत्र -२ नाही, प्रभाग ५ ब गोविंद केशवराव फाजगे (भाजपा) जोडपत्र-२ नाही, प्रभाग ६ ब दैवशाला चंद्रकांत नळगे (कॉंग्रेस) जोडपत्र-२ नाही, प्रभाग ७ ब जयपाल रुस्तुम पवार (शिवसेना) जोडपत्र-२ नाही, प्रभाग ७ ब श्रीकांत वसंतराव पवार (कॉंग्रेस) जोडपत्र -२ नाही, प्रभाग ८ ब शेख यूनुस मैनोद्दीन (कॉंग्रेस) जोडपत्र-२ नाही, प्रभाग ८ ब माधव गणेश राठोड (शिवसेना) सुचक प्रभाग मधील नाही.

Web Title: Eight people in the fray for Iron Ore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.