‘वतन वेलफेअर सोसायटी’ने जोडले आठ हजार संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:46 AM2019-04-28T00:46:27+5:302019-04-28T00:47:02+5:30

समाजातील विविध घटकांतील कुटुंबियांमध्ये होणाऱ्या कुरबुरी सोडवून पुन्हा संसाराचा गाडा रुळावर आणण्याचे काम ‘वतन’ मार्फत सुरू आहे.

eight thousandd family dispute solve by Vatan Welfare Society | ‘वतन वेलफेअर सोसायटी’ने जोडले आठ हजार संसार

‘वतन वेलफेअर सोसायटी’ने जोडले आठ हजार संसार

Next

अनुराग पोवळे ।
नांदेड : लहान-मोठ्या कुरबुरीतून सुरू असलेल्या सुखी संसाराचा गाडा ‘तलाक’पर्यंत पोहोचू नये, त्यातून समाजाचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी ‘वतन वेलफेअर सोसायटी’ पुढे आली असून समाजातील विविध घटकांतील कुटुंबियांमध्ये होणाऱ्या कुरबुरी सोडवून पुन्हा संसाराचा गाडा रुळावर आणण्याचे काम ‘वतन’ मार्फत सुरू आहे. या सामाजिक उपक्रमाला समाजातील अनेक घटकांकडून मदत मिळत आहे.
कधी सासू-सुनेच्या तर कधी नवरा-बायकोच्या भांडणातून कौटुंबिक वाद निर्माण होतात. याच वादातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. समाजात अशा उद्ध्वस्त होणाºया कुटुंबांची संख्या वाढत आहे. हे पाहून २०१० मध्ये स्थापन झालेल्या वतन वेलफेअर सोसायटीने घरातील कुरबुरी सोडविण्याचे काम हाती घेतले. शहरातील मीलरोड भागात एक कार्यालयही सुरू केले. या कार्यालयात प्रारंभी मुस्लिम समाजातील कौटुंबिक वाद समोर आले. त्यानंतर इतर धर्मिय कुटुंबही आपले वाद घेऊन येऊ लागले. या वादात तोडगा काढण्यात ‘वतन’ला यशही आले. घरातील लहान-मोठ्या कुरबुरीतून हुंडाबळीच्या केस केल्या जात होत्या. हे चित्र ‘वतन’ने बदलले. ‘वतन’कडे आलेल्या ८ हजार २०० प्रकरणांत तडजोड घडवण्यात यश आले. वाद मोठे असतील तर पोलीस, कायदेतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. प्रसंगी मौलवींचा आदेशही दोन्ही कुटुंबियांना देवून संसार चालवण्याचे निर्देश देण्यात आले.
सोसायटीकडून समाजातील गरीब कुटुंंबियांना मदतही केली जात आहे. आजघडीला दोन वर्षांपासून ८५० कुटुंबियांना दरमहा अन्न-धान्य दिले जात आहे. १०० विवाहही लावून देण्यात आले आहेत.
‘वतन’ सोसायटीमध्ये शनिवार, रविवारी दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावून मार्ग काढला जातो. वतन वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष गफार खान, नगरसेवक शेर अली, साबेर चाऊस, अथर उल इमान, सिकंदर मौलाना, मसूद खान, अब्दुल गफार, रईस खतीब, फेरोज लाला, नासेर लाला, आसिफ नदवी मौलाना, मुस्ताक मेमन, याकूब मेमन आदी या उपक्रमासाठी मदत करीत आहेत.

  • तोडगा नाही तर तलाकचा निर्णयही अनेक कुटुंब घेतात. ‘वतन’कडे आलेल्या प्रकरणात काही वाद सोडविण्यापलीकडे पोहोचतात. त्यावेळी मात्र तलाकशिवाय पर्याय नसतो. जवळपास २४४ प्रकरणांत तोडगा न निघाल्याने तलाकचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: eight thousandd family dispute solve by Vatan Welfare Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.