निवडणुकीमुळे जातप्रमाणपत्राची किंमत वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:56+5:302020-12-26T04:14:56+5:30
हदगाव : ग्रामपंचायत निवडणुका लढविणा-या उमेदवारांची कागदपत्रे जमविण्यासाठी दमछाक होत असून कागदपत्राचे महत्व ओळखून महसुल विभागात प्रमाणपत्राचे भाव वाढले ...
हदगाव : ग्रामपंचायत निवडणुका लढविणा-या उमेदवारांची कागदपत्रे जमविण्यासाठी दमछाक होत असून कागदपत्राचे महत्व ओळखून महसुल विभागात प्रमाणपत्राचे भाव वाढले आहेत.
तालुक्यात १०८ ग्रामपंचायत निवडणुक रिंगणात आहेत त्यापैकी ४८ सरपंच ओबीसीचे होणार आहेत. २६ एस्सी व १३ आदीवासी त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नाहीत ते तात्काळ ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत या संधीचा फायदा महसुल विभाग उचलायला तयार आहे. गावातील सेतु केंद्रापासून नायब तहसीलदारापर्यंत हे जाळे पसरले आहे.
अनुसुचीत जातीचे प्रमाणपत्र शंभर दोनशे रुपयांत काढून देणारे चार हजार रु मागणी करीत आहेत. तर ओबीसीसाठी आठ ते दहा हजार रु मोजावे लागत आहेत.
मनाठा येथील एका उमेदवाराने संपूर्ण कागदपत्रे जुळवून जात प्रमाणपत्र संचीका तयार केली गावातील सेतु चालकास आठ हजार रु ठरले.
याच सेतु चालकाने विरोधकास ही माहीती दिली. त्याने राजकीय वजन वापरुन ते प्रमाणपत्र थांबविले. यामुळे उमेदवार भडकला सेतू चालकास जात प्रमाणपत्र दे अथवा दिलेले पैसै परत कर अभी मागणी केली सेतू चालकाने हात वर केले. मी साहेबांना पैसे दिल्याचे सांगीतले आता ते कोण साहेब यांची चौकशी सुरू आहे.
ओबीसी प्रमाणपत्रासाठी योग्य कागदपत्रे दिल्यास जातप्रमाणपत्र देण्यास अडचण नाही पण आमदारांनी फोन केल्यामुळे तहसिलदार चक्रावले आहेत गावपातळीवरील राजकारण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही.
पण काही असो कोरोणामुळे अडचणीत आलेले एकूण व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत.आँनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी एक हजार रुपये मोजावै लागत आहेत वरती भरवशाचा संगणक चालक भेटला तर बरा नाहीतर त्रुटीत अर्ज येण्याची धास्ती वेगळीच.