धर्माबाद तालुक्यातील सहा गावांत निवडणूक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:23 AM2018-02-19T00:23:13+5:302018-02-19T00:23:24+5:30
तालुक्यातील हासनाळी ग्रामपंचायतची सार्वत्रिक व पंधरा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडत असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सहा गावांतील एकही उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने त्या गावांतील निवडणूक रद्द झाली आहे. अकरा गावांत निवडणूक होत असून काही गावांतील सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर पाच गावांत अटीतटीची लढत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : तालुक्यातील हासनाळी ग्रामपंचायतची सार्वत्रिक व पंधरा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडत असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सहा गावांतील एकही उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने त्या गावांतील निवडणूक रद्द झाली आहे. अकरा गावांत निवडणूक होत असून काही गावांतील सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर पाच गावांत अटीतटीची लढत होत आहे.
धर्माबाद तालुक्यातील बाभळी (ध), बन्नाळी, राजापूर, आटाळा, पाटोदा (थ), आल्लूर-नेरली या सहा गावांत पोटनिवडणूक होत असून या गावांतून शेवटपर्यंत एकही अर्ज प्राप्त झाला नसल्यामुळे या गावात निवडणूक होणार नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. उर्वरित गावांत निवडणूक होत असून बेल्लूर (बु) गावातून मीनाताई राजेश्वर धानुरे, लक्ष्मीबाई पोशष्टी मदनुरे, शंकर गंगाराम कंठे यांची बिनविरोध निवड झाली. आतकूर- सुलोचना विठ्ठल हडपे, नायगाव (ध)- राजेश्वर गोविंदराव सदनपांडे, चोळाखा- सुमनबाई परसराम कदम, जारीकोट- पूजा विजय यडपलवार, माष्टी-शिवाजी नरसिंगा वडेटवार तर शेळगाव (थ) या गावातून विपीन ग्यानोबा सोनटक्के यांची बिनविरोध निवड झाली. तर पाच गावांत अटीतटीची निवडणूक होत आहे.
आतकूर ग्रामपंचायतीत रमेश कागेरू व गंगाधर जाजुलवाड या दोघांत लढत होत आहे. जारीकोट ग्रामपंचायतीत रवींद्र मुपडे व बालाजी रामोड या दोघांत लढत होत आहे. चिकना ग्रामपंचायतींत मोहन पंढरी पांचाळ, महम्मद इब्राहिम बाशुमीयॉ, किरण हानमंत शेड्डे या तिघांत लढत होत आहे. चिंचोली ग्रामपंचायतींत गुरूराज कोदळे व मारोती काळे या दोघांत लढत होत आहे.
हासनाळी ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडत असून सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, मात्र सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक पार पडणार असून अटीतटीची लढत होत आहे.
सरपंचपदासाठी संतोष कावडे, संजय कावडे, हणमंत किरोळे या तिघांत लढत होत आहे. शिवशंकर पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार - अजंनबाई गोविंदराव सकिरगे, गंगाधर नागोराव कावडे, सविता देवीदास वाघमारे, गंगाधर लक्ष्मण कावडे, लक्ष्मीबाई हणमंत आडकिणे. तर विरोधी गटाचे आकाश हणमंतराव किरोळे, योगिता हणमंतराव किरोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती चौव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सुनील माचेवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा न. प. कार्यालयीन अधीक्षक रूक्माजी भोगावार, निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. लोखंडे,एल. एन. गोडबोले, लिपीक एम.एम.टोंपे काम पाहत आहेत. धर्माबाद तालुक्यातील पाच गावांत २७ फेब्रुवारी रोजी मतदान तर २८ रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.