जोडणी न देताच हातावर टेकविले वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:49 AM2018-03-18T00:49:36+5:302018-03-18T00:49:40+5:30
कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़
गोकुळ भवरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील गौरी येथील शेतकऱ्याने कोटेशन भरुनही शेतात अद्याप वीज जोडणी झालीच नाही़ उलट १० हजार ९०० रुपयांचे महावितरणने वीजबिल आकारल्याने वीज वितरणच्या आले मना तेथे कोणाचे चालेना असेच काहीसे म्हणावे लागेल़ वीजजोडणी न झाल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे़
किनवट तालुक्यातील गौरी येथील गौतम उमरे या शेतकºयाने कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज करुन ३१ डिसेंबर २०१४ रोजी ५ हजार २०० रुपये कोटेशन भरले़ मात्र कोटेशन भरुनही शेतात अद्याप विद्युत खांब उभे केलेले नाहीत़ वीज जोडणी तर दूरच, असे असताना मात्र महावितरणने चक्क १० हजार ९०० रुपयाचे बिल उखळल्याने शेतकरी गोंधळला असून खांबही नाही अन् जोडणीही नाही मग वीजबिल आकारले कसे? महवितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहकांतून मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे़
२०१४ मध्ये कोटेशन भरलेल्या ग्राहक शेतकºयाला ग्राहक क्रमांक ५६५६७०००११२९ असा असून सप्टेंबर २०१७ ला १० हजार ९०० रुपये बिल आकारुन देय २९ नोव्हेंबर २०१७ रोजी बिल भरण्याच्या अंतिम तारखेनुसार बिल भरल्यास १० हजार ९१० रुपये भरावे लागतील असे बिलात नमूद केले आहे़
तीन वर्षांपासून कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतात वीजजोडणी न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामात पिकाला पाणी देऊ पाहणाºया व रबी व उन्हाळी हंगाम घेऊ इच्छिणाºया शेतकºयांच्या आशेवर पाणी फिरले असतानाच त्यात भर म्हणून वीजपुरवठा नसतानाही महातिवरणने चक्क कृषीपंपाचे वीजबिल आकारुन शेतकºयाला गोंधळात टाकले आहे़ महावितरणच्या या उलट्या कारभारामुळे कामकाजाची घडी विस्कळीत झाल्याचा आरोप शेतकरी गौतम उमरे यांनी केला आहे़
अधिकारी म्हणतात...
याबाबत किनवट वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता आऱआऱ परचाके यांना विचारले असता हे प्रकरण जुने असून केबल डिक्लेअरचा इश्यू आहे़ वीज वितरणने तसा प्रस्तावही सादर केला आहे़ २ कोटी ६२ लक्ष रुपयांची मागणी केलेली आहे़ यंदा डिसेंबर अखेरपर्यंत प्रलंबित वीजजोडणीचे काम मार्गी लागेल असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़