तीन महिन्यात राज्यभरात ५० लाख युनिटची वीजचोरी, महावितरणने अशी आणली उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:22 PM2022-12-08T19:22:46+5:302022-12-08T19:27:35+5:30

राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फिडर निश्चित करून महावितरणने ही गळती उघडकीस आणली आहे.

Electricity theft of 50 lakh units across the state in three months, Mahavidran has brought this to light | तीन महिन्यात राज्यभरात ५० लाख युनिटची वीजचोरी, महावितरणने अशी आणली उघडकीस

तीन महिन्यात राज्यभरात ५० लाख युनिटची वीजचोरी, महावितरणने अशी आणली उघडकीस

Next

नांदेड :महावितरणच्या अधिकाऱ्यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मागील तीन महिन्यांत राज्यातील ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस आणण्यास यश आले आहे. महावितरणच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

महावितरणच्या प्रत्येक फिडरवरून गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकाच्या मीटरवर नोंद झालेला वीज वापर याची पडताळणी करून वीज गळती निश्चित केली जाते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीज गळती असलेले फिडर्स निश्चित केले होते. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित ग्राहकाच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येते का? मीटरमध्ये फेरफार केला आहे का, आकडा टाकून वीज चोरी होत आहे का, याची माहिती काढून अधिकाऱ्यांनी कारवाई केली. 

मागील तीन महिन्यांपासून राज्यभरात ही मोहीम सुरू होती. परिणामी वीज चोरीला आळा बसला असून, ५० लाख युनिटची वीज चोरी राज्यात उघडकीस आणली आहे. राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फिडर निश्चित करून महावितरणने ही गळती उघडकीस आणली आहे. ५० ते ७० टक्क्यांपर्यंत असलेली गळती २० टक्क्यांवर आणणे, ३० ते ५० टक्के असलेली गळती १५ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून हे काम करण्यात आले. तीन महिन्यांत मिळालेल्या यशामुळे यापुढेही मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Electricity theft of 50 lakh units across the state in three months, Mahavidran has brought this to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.