पिकांच्या बचावासाठी विद्युत तारांचे बेत शेतकऱ्यांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:54 PM2019-09-06T18:54:16+5:302019-09-06T18:56:27+5:30

 वन विभागाकडे ना उपाययोजना ना मदत

Electricity wires are planned to protect the crops are kills farmer | पिकांच्या बचावासाठी विद्युत तारांचे बेत शेतकऱ्यांच्या जिवावर

पिकांच्या बचावासाठी विद्युत तारांचे बेत शेतकऱ्यांच्या जिवावर

Next
ठळक मुद्दे खबरदारीची गरज  शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न

कासराळी (नांदेड ) : येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या बामणी बु.येथील गेटकेवार पिता-पूत्रांचा शेतातील धुऱ्याच्या कडेने रानडुकरापासून पिकाच्या बचावासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनात वीज प्रवाह सोडल्याने मंगळवारी धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेच्या पश्चात  या अनुषंगाने निर्माण झालेल्या बाबींचा नैसर्गिक आपत्तीत समावेशच नाही. तर दुसरीकडे या घटना आगामी काळातील संभाव्य घटना टाळण्यासाठी ना वनविभागाकडे उपाययोजना आहे ना महसुलची मदत मिळणार नसल्याने शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

मंगळवारी बामणी बु.येथील रजनीकांत गेटकेवार (४०) हे मुलगा विजय (१४) याच्यासमवेत स्वत:च्या शेतातील मूग पिकास आणि मसाई पुजण्यास गेले होते. शेतालगतच असलेल्या संजय गेटकेवार यांच्या शेतीतील धु-यावर तारांच्या कुंपनात विद्युत प्रवाह सोडल्याने या पितापूत्राचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला़ मात्र ज्या कारणांनी हा विद्युत प्रवाह सोडला ते केवळ रानडुक्करे आणि अन्य वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीपासून बचावासाठी असला तरी हा  प्रकार ग्रामीण भागात सर्रासपणे केला जातो. वास्तविक अशी घटना नैसर्गिक आपत्तीत गणली जात नाही असा सरकारी निकष आहे. मात्र वनविभागांकडून या प्राण्यांवर बंदोबस्तासाठी कसलेही उपाययोजना नाहीत ना अश्या घटनातील शेतक-यांना मदत. केवळ पिकांच्या नुकसानीची मदत मिळते इतकेच तर दुसरीकडे महसुल विभागांकडून विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडूनही घटना नैसर्गिक आपत्तीत येत  नसल्याने आर्थिक मदतही मिळत नाही. तर तिसरीकडे वीज वितरण कंपनी अशा घटनांची जबाबदारी घेत नाही ना वीज प्रवाह सोडणा-या शेतक-यांना प्रतिबंध करत नाही.मात्र यात गाफील शेतक-यांचा हकनाक बळी जातो अशी ही विसंगती आढळून येते. मात्र अशा भविष्यात घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आणि जागृतीची गरज आहे. ज्यामुळे भविष्यात अश्या घटना टाळणे शक्य होईल. अनेकांचे जीव वाचतील 

अधिकारी म्हणतात ...
नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जिवीतहानी जसे वीज पडणे आणि पूर येणे अशा आपत्तीसाठी महसुल विभागाची मदत आहे 
- डॉ.ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार, बिलोली़
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा पिकांचे नुकसान झाल्यासच वनविभाग संबंधितांना आर्थिक मदत करते़ मात्र अपघातजन्य किंवा अन्य बाबींतील आर्थिक व जीवीत नुकसानीसाठी वनविभाग मदत करीत नाही 
-शिवानंद कोळी, वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर
शेतक-यांना अशा घटनांना सामोरे जावे लागते याचे खेद आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून खबरदारी ही घेणे ही गरजेचे आहे 
 -विजय घुगे, तालुका कृषी अधिकारी, बिलोली़

Web Title: Electricity wires are planned to protect the crops are kills farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.